कर्जत येथील प्रशिद्ध सोन्याचे व्यापारी सचिन कुलथे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतला माझी वसुंधरा अभियाना साठी दोनशे ट्रि गार्ड भेट


कर्जत येथील प्रशिद्ध सोन्याचे व्यापारी सचिन कुलथे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतला माझी वसुंधरा अभियाना साठी दोनशे ट्रि गार्ड भेट

 कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत येथील सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते व सर्व सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रभागी असलेले प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन  कुलथे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व आमदार रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्जत नगरपंचायतला माझी वसुंधरेच्या निमित्त सचिन कुलथे यांच्या वतीने 200 ट्री गार्ड भेट म्हणून या मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी  गोविंद जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. नेत्याचा वाढदिवस म्हटलं की कार्यकर्त्यांसाठी एक मेजवानीच असते आणि यावेळी कार्यकर्त्यांना भोजन देत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात येत असतो.  परंतु राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व कर्जत येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी सचिन कुलथे यांनी आपल्या वाढदिवसाच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन एक आदर्श असे कार्य जनतेसमोर मांडले आहे. कर्जत नगरपंचायत ने माझी वसुंधरा अभियानात आत्ता राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून आता कर्जत नगरपंचायतने पुन्हा माझी वसुंधरा अभियानात दुसऱ्यांना भाग घेतलेला असून पुन्हा कर्जतला प्रथम क्रमांक मिळवण्याचा चंग गावातील नागरिकांनी व कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी  गोविंद जाधव यांनी बांधलेला दिसत आहेत. आणि यालाच मोलाची साथ  म्हणून सचिन शेठ कुलथे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त  शंभर ट्री गार्ड  आणि कर्जत मधील सामाजिक संघटनांच्या श्रमदानाच्या 300 व्या दिवसानिमित्त शंभर ट्री गार्ड असे एकूण दोनशे ट्री गार्ड आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी  गोविंद जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की कर्जत येथील सर्व नागरिकांनी सचिन कुलथे यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी एक तरी ट्रि गार्ड कर्जत नगरपंचायत कडे सुपूर्त करावेत असे आवाहन केले. यावेळी त्यांनी सचिन कुलथे यांनी दोनशे ट्री गार्ड नगरपंचायत ला दिल्याबद्दल कुलथे यांचे  कौतुक केले व सचिन कुलथे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, कर्जत नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, दिलीप जाधव, संतोष मेहेत्रे, रज्जाक झारेकरी, कर्जत पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव, नगरपंचायतीच्या नगरसेविका मनीषा सोनमाळी, डॉक्टर शबनम इनामदार, नव्यानेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले प्रसाद ढोकरीकर, लालासाहेब शेळके, नितीन तोरडमल, आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सचिन कुलथे म्हणाले की माझ्या वाढदिवसाचा वायफळ होणारा खर्च टाळून कर्जत नगरपंचायतने राबवलेल्या माझी वसुंधरा दोन मध्ये माझा सहभाग असावा या नात्याने  सुरु असलेल्या वृक्षलागवडीसाठी दीड लाख रुपये खर्चून दोनशे ट्री गार्ड कर्जत नगरपंचायतला  सप्रेम भेट दिले आहेत. यामुळे लावलेल्या वृक्षांचे संरक्षण होऊन झाडांच्या वाढीस मदत मिळेल अशी भावना सचिन कुलथे यांनी यावेळी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News