रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद -अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद -अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत ) शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीचे वेळी घराचे दरवाजे उघडून मारहाण करुन लुटमार करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई . प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि , दिनांक ०८/०८/२०२१ रोजीचे रात्री फिर्यादी श्री . दिलीप संभाजी पवार , वय ३८ वर्षे , रा . भगूर , ता . शेवगाव हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांचे घराचा दरवाजा वाजविला . त्यावेळी फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला असता आरोपींनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी व फिर्यादीचे आईस लोखंडी गजाने मारहाण करुन सोन्याचे दागिणे , रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३ ९ , ००० / -रु . किं . चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता . सदर घटनेबाबत शेवगाव पो.स्टे . येथे गुरनं . 1 ४७८/२०२१ , भादवि कलम ३ ९ ४ , ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांचे सुचनानुसार श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगरयांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा घाऱ्या उर्फ शिवम काळे , रा . साकेगाव , ता . पाथर्डी याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , सपोनि / गणेश इंगळे , पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे , सुनिल चव्हाण , मनोहर गोसावी , पोन दिपक शिंदे , शंकर चौधरी , पोकॉ / सागर ससाणे , सागर सुलाने , रोहीत येमूल , चालक पोहेकॉ / उमाकांत गावडे अशांनी मिळून पाथर्डी येथे जावून आरोपीचे टाविठकाणाबाबत गोपनिय माहीती घेवून व शोध घेवून आरोपी नामे १ ) अनिकेत उर्फ पाय उर्फ शिवम वैभव काळे , वय- २० वर्षे , रा . साकेगाव , ता . पाथर्डी यांस साकेगाव परिसरातून पाठलाग करुन ताब्यात घेतले . त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला . त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे इतर चार साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे २ ) सेशन उर्फ रोशन उर्फ सेशा रायभान भोसले , वय -३० वर्षे , रा . साकेगाव , ता . पाथर्डी यास ताब्यात घेतले उर्वरित तीन साथीदारांचा शोध घेतला . परंतु ते मिळून आले नाहीत . ताब्यात घेतलेल्या वरील नमुद दोन आरोपीकडून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ७,००० / -रु . किं . चा विवो कं . चा मोबाईल जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पो.स्टे . येथे हजर करण्यात आलेले असून पुढील कार्यवाही शेवगाव पो.स्टे करीत आहेत . आरोपी अनिकेत क धान्या उर्फ शिवम वैभव काळे याचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) पैठण पो.स्टे . औरंगाबाद गुरनं . 1२०८/२०१७ , भादवि कलम ४५७ , ३८० २ ) रहिमतपूर पो.स्टे . सातारा गुरनं . 1 ९९ / २०१ ९ , भादवि कलम ३६३ , ३६६ , ३७६ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . सुदर्शन मुंढे साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News