अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी - कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद


अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी - कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत ) अहमदनगर शहरातील मोटर सायकल चोरी करुण त्याची विक्री करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद दि .१४ / ०६ / २०२१ रोजी फिर्यादी नामे बाबासाहेब अंबु बनकर वय- ४५ वर्ष धंदा- गवंडीकाम रा कोल्हेवाडी ता नगर जि अहमदनगर यांनी फिर्याद दिली की , मार्केटयार्ड मेन गेटच्या शेजारील चहा टपरीच्या जवळून त्यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल क्रं एम एच १६ सी टी २६८ ९ ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या ड्रादयाने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरुन नेली आहे.वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरन । ४१४/२०२१ भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरील गुन्हा दाखल होताच सदर तपास करणेबाबत मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो . यांनी पोलीस अधिक्षक मनोज मनोज पाटील सो , अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल सो , मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल ढुमे सो , यांचे मार्गदर्शना खालील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे माळीवाडा भागात आरोपींचा शोध घेत असतांना मा पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर सो यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील आरोपी हा आयुर्वेद कॉर्नर परीसरात आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिल्याने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील सशंयित आरोपी यास मोठया शिताफिने तात्काळ ताब्यात घेतले असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांस अधिक विश्वासात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाच १ ) गणेश देविदास नल्ला वय- २३ वर्षे धंदा- मजुरी रा- श्रमिक नगर पाईपलाईन रोड अहमदनगर असे असल्याचे सांगुन त्याचे साथीदार २ ) हनुमत राजेंद्र गायकवाड वय २० वर्ष रा मुंगुसवाडी खरवंडी ता पाथर्डी जि अ नगर ३ ) दिपक बाळ कांबळे वय २६ वर्ष रा मोकाशे वस्ती कादंबरी नगरी पाईपलाईन रोड अ नगर ४ ) शिवाजी सोन्याबाप साबळे वय ३१ वर्ष रा तपोवन रोड शिवाजी नगर अ नगर याना ताब्यात घेवून त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याचे ताब्यात २,६०,००० रु कि चा गुन्हयातील मिळालेला मुददेमाल खालील प्रमाणे , १ ) २०,००० / - रु किं ची एक होंडा शाईन कपनीची काळया रंगाची चेसी नं एमई ४ जेसी ८५२ एचएलडी..८ ०३ , इंजिन नंबर जैसी ८५ ईडी ०० ९ १६३५ असलेली जुवाकिअं २ ) ४०,००० / - रु कि ची एक काळ्या रंगाची होन्डा कंपनीची शाईन चेसी नं MEJC३६JLCU२३७४४८ असा असलेली जुवाकिज ३ ) ४०,००० / -रु कि ची काळ्या रंगाची होन्डा कंपनीची शाईन चेसी MEXICLEBMD१४२०५१ इंजिन नंबर JCE : ED०३३४३०१ असा असलेली जुवाकिअं ४ ) ४०,००० / - रु किंची काळ्या रंगाची होन्डा शाईन चेसी MERICE : BG - ३००७७१ असा असलेली जुवाकि ५ ) २०,००० / -रु किं ची एक लाल रंगाची हिरो होन्डा कंपनीची पॅशन प्रो त्याचा चसी – MBLHAPDERIGF ३५४३० व इंजिन नंबर HAYEDGF२१ ९ ८० असा असलेली जवाकिों


६ ) २०,००० / - रु किं ची एक काळया रंगाची हिरो होन्डा कंपनीची पॅशन प्रो तिचा चेसी नंबर MBLHA१०E WBHA ३ ९ ५३२ व इंजिन नंबर HAPPEDBHA४४६ ९ ४ असा असलेली जुवाकिअं ७ ) ४०,००० / - रु किंची एक काळया रंगाची सुझुकी एक्सेस तिचा चेसी नंबर MBCCFCAM७८१०७३६२ तिचा इंजिन नंबर F४८६१०७०२० असा असलेली जुवाकिअं ८ ) ४०,००० / - रु किं ची होन्डा शाईन काळे रंगाची चेसी क्रं ०५८० ९ ६३८७३८ इंजीन क्रं 0.com३७ ९ ६३ जु वाकिं २,६०,००० / - एकुण सदर आरोपी याच्या विरुध्द यापुर्वी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर व इतर पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे उकल झाले आहेत तसेच दाखल आहेत . कोतवाली पोलीस स्टेशन १ ) गुरनं ४१४/२०२१ भादवी ३७ ९ २ ) गुरनं ५२५/२०२१ भादवी ३७ ९ ३ ) गुरनं ४८०/२०२१ भादवि ३७ ९ ४ ) गुरनं ४७५/२०२१ भादवि ३७ ९ ५ ) गुरनं ४५४/२०२१ भादवि ३७ ९ व तोपखाना पोस्टे चा ६ ) गुरनं ४२ ९ / २०२१ भादवि ३७ ९ ७ ) गुरनं ४७४ / २०२१ भादवि ३७ ९ दाखल गुन्हे ०१ ) गु र नं ३११/२०१३ भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे ०२ ) गु र नं ३१४/२०१३ भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे ०३ ) गुर नं ३२४/२०१२ भा द वि कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशन ०४ ) गु र नं १००/२०१७ भा दवि कलम ४२०,४१ ९ , १७७ प्रमाणे ०५ ) पारनेर पोलीस स्टेशन गु र नं ४२०,४०६ प्रमाणे ०६ ) गु र नं २४ ९ / २०२० भा द वि कलम ४२० प्रमाणे ०७ ) गु र नं ३ ९ २ / २०२० मा द वि कलम ४२० प्रमाणे ०८ ) गु र नं २४५/२०२१ भा द वि कलम ४२० प्रमाणे ९ ) गुर नं ३८ ९ / २०२१ भा द वि कलम ४२० प्रमाणे सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील  पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल  , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांकर  पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे , पोना बंडु भागवत , पोना शाहीद शेख , पोना सुमित गवळी , पोना अभय कदम , पोकाँ दिपक रोहकले , पोना आनंद दाणी , पोना योगेश भिंगारदिवे , पोना नितीन शिंदे , पोना सागर पालवे , पोना नितीन गाडगे , पोना भारत इंगळे , पोकॉ सुशील वाघेला , सुजय हिवाळे , पोकॉ तान्हाजी पवार , पोकॉ कैलास शिरसाठ , पोकॉ प्रमोद लहारे , पोकॉ सोमनाथ राऊत , यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News