शेवगाव तालुक्यात गिन्नी गवतापासून बायोसीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प,, सभासद नोंदणीला सुरुवात


शेवगाव तालुक्यात गिन्नी गवतापासून बायोसीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प,, सभासद नोंदणीला सुरुवात

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

ग्रीन गोल्ड ऑरगॅनिक प्रोडूसर  लिमिटेड, ग्रीन गोल्ड क्लीन फ्यूएल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व एम सी एल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शेवगाव तालुक्यात सुमारे १ लक्ष किग्रॅ, दररोज निर्मिती

क्षमतेच्या बायो-सीएनजी (Bio-CNG) प्रकल्पाची सुरुवात होत आहे.  त्या त्यानिमित्त आज  खंडोबा मैदान, नाकाडे कॉम्प्लेक्स, शेवगाव या ठिकाणी कंपनीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गावातील शेतकरी वसंतराव गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कंपनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेली असल्यामुळे  शेतकऱ्याच्याच हाताने या कंपनीचे कार्यालयाचे उद्घाटन करून नवीन आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.

श्री भाऊसाहेब पाचारणे सर यांनी सूत्रसंचालन केले,  सर्व पाहुण्यांचे व उपस्थित ग्राम उद्योजकांचे स्वागत केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्रीरामपूर तालुक्यातील जेष्ठ अर्थतज्ञ श्री बबनराव अदिक सर यांनी कंपनीच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली व तालुक्याच्या सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून सदर प्रकल्पाची सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक माहिती देताना ग्रीन गोल्ड ऑर्गानिक प्रोडूसर कंपनीचे संचालक श्री राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले की आपल्या तालुक्यात स्वच्छ इंधन-बायोफ्युएल व कँसर मुक्त, केमिकल मुक्त सेंद्रिय शेती या दोन क्षेत्रांचा विकास या प्रकल्पाद्वारे आम्हाला करावयाचा आहे.

सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्याला आम्ही इंधनामध्ये स्वयंपूर्ण करणार असून त्यामध्ये वाहतुकीचे इंधन (पेट्रोल, डिझेल, खनिज सीएनजी याला १००% पर्याय), स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन (एल पी जी ला १००% पर्याय) व औद्योगिक क्षेत्रासाठी (डिझेल,FO,LDO यांना १००% पर्याय) लागणा-या

आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करणार आहोत. ह्या स्वच्छ इंधनामुळे आपला तालुका प्रदुषण मुक्त होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सदर इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच गींनी गवत, किंवा हत्ती गवत हे शेतातच निर्माण होणार असून कर्जमुक्त अशा करार शेती (contract farming) मार्फत

शेतकर्यासाठी शाश्वत १००० ₹ प्रतिटन भाव  देऊन आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आम्ही कार्य करणार आहोत. या प्रकल्पा अंतर्गत सुमारे २००० हेक्टर ते १०००० हेक्टर पर्यंत करार शेती करणे शक्य होणार आहे.

सदर प्रकल्पामुळे अंदाजित २००० प्रत्यक्ष रोजगार व १५०० ते २००० अप्रत्यक्ष रोजगार आपल्या तालुक्यात निर्माण होणार आहेत. त्यामुळे तालुका सोडून, आपले गाव सोडून नोकरीसाठी स्थलांतराची गरज आता राहणार नाही. सदर व्यवसायांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे असे कमीत कमी ५००० ते १०००० रुपये महिना उत्पन्न व्हावे हे आमचे ध्येय आहे.

आज तालुक्यातील प्रत्येक गावातून एक शेतकरीच ग्राम उद्योजक म्हणून निवडला जात आहे.


 त्यानंतर त्यानंतर कंपनीचे संचालक दत्तात्रय फुंदे साहेब यांनी सर्व जनतेला आव्हान केले की आज आपल्या गावातील, तालुक्यातील शेतक-यांच्या, मजुरांच्या, कामगारांच्या, पदवीधारक तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी आपण संघटित होण्याची गरज आहे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी कोणत्याही बाहेरच्या कंपनीची, संस्थेची वाट न पाहता, आपणच जबाबदारी उचलायची आहे. आपणांस नम्र विनंती आहे कि, आपण तालुक्यातील जास्तीत जास्त कुटुंबांना त्यांच्या विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.

त्यानंतर ह भ प राम महाराज झिंजुर्के यांनी आशीर्वाद देऊन पुढील शेतकऱ्यांच्या हिताच्या कामाला शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी 

खडेश्वरी कृषी संकल्प शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री बाबुराव चावरे साहेब, महेश चावरे, मयुर चावरे, येळवंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शेवगाव तालुक्यातील माऊली निमसे, संदीप मोटकर अशोक ढाकणे दादासाहेब सातपुते वृद्धेश्वर पालवे भाऊसाहेब पाचारणे व संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाचे ग्राम उद्योजक उपस्थित होते

शेवटी सर्व पाहुण्यांचे आभार प्रदर्शन श्री संदीप मोटकर साहेब यांनी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News