साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी व समितीच्या अध्यक्ष व सदस्यां विरूद्ध कटकारस्थान अणि बदनामी केल्याप्रकरणी मा. उच्च न्यायालयाची पोलिसांना नोटिस


साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी व  समितीच्या अध्यक्ष व सदस्यां विरूद्ध कटकारस्थान अणि बदनामी केल्याप्रकरणी मा. उच्च  न्यायालयाची पोलिसांना नोटिस

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र  तासकर

साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न केल्याप्रकरणी व मंदिरच्या CCTV फुटेज चा गैरवापर मकरून  तदर्थ समितीच्या अध्यक्ष व सदस्य विरुद्ध कटकारस्तान व बदनामी केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाची पोलीस प्रशासनाला नोटीस.

दि. ०९. १०. २०२१ रोजी मा. उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थान चा कारभार सांभाळण्यासाठी तदर्थ समिती स्थापन केली आहे. साईबाबा संस्थान ट्रस्टचे आज रोजी, प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर हे तदर्थ समितीचे अध्यक्ष आहे, साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सचिव आहे, तर अतिरिक्त विभागीय आयुक्त, नासिक व सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर हे समितीचे सदस्य आहेत.  तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय मा. उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे. सदर समिती ऑक्टोबर , २०१९ पासून साईबाबा संस्थान चा कारभार  सांभाळत आहे. 

श्री. कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी हे तदर्थ समितीला सुरळीत काम करण्यास आडकाठी आणतात असे अहवाल वेळोवेळी मा. अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी मा. उच्च न्यायालयात सादर केलेले आहे. तसेच श्री. बगाटे यांनी बेकायदेशीर पद्धतीने शासनाची दिशाभूल करून तिरुपती दौरा केला. तसेच त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी  पदी नियुक्ती नियमाला धरून नसल्यामुळे  सनदी IAS  अधिकारी नेमावा.  अशा विविध विषयवार कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय काळे यांनी तक्रारी राज्य शासनाकडे केल्या होत्या. सदर तक्रारींवर चौकशी देखील चालू आहे. 

तसेच तदर्थ समितीच्या अध्यक्ष विरुद्ध तक्रार करण्यासाठी भडकावणे, वॉट्सअप वर मेसेज करून हॉस्पिटल मधील विषय संधर्बात माहिती मागवणे व तक्रार करण्यासाठी दबाव टाकणे, तसेच काळे यांच्या बद्दल बदनामीकारक संदेश सामाजिक माध्यमावर टाकणे, धमकावणे, तसेच कर्मचाऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याचे सांगणे इ. बाबी श्री. बगाटे यांनी सुरु केल्या होत्या. त्यामुळे श्री. काळे यांनी सदर बाबीची देखील तक्रार पोलीस यंत्रणेला दिली होती.   

दि. ३१. ०५. २०२१ रोजी, मा. अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर व सदस्य तथा सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्यांचे मंदिर परिसरातील फोटो व CCTV फोटेज विनापरवानगी श्री. बगाटे व त्यांचे कर्मचारी यांनी स्थानिक वृत्तवाहिनी ला देऊन त्यांच्यावर दर्शन घेतल्याचा उहापोह करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच सामाजिक माध्यमावर सदर प्रकरणाचा आधार घेत श्री. काळे यांची  बदनामी करणारा संदेश श्री. बगाटे व श्री. नवनाथ दिघे यांनी प्रसारित करण्याचा पुढाकार घेतला. त्याअनुषंगाने पत्रकार नवनाथ दिघे यांच्या वर कलम ५०० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला परंतु श्री. बगाटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागेल असे पत्र कोपरगाव शहर पोलीस ठाणे मार्फत दिले होते.   

श्री. काळे यांनी ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून श्री. बगाटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी लागेल असे पत्र नियमबाह्य असल्याचा दावा करत त्यांच्या वर गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती सदर याचिकेत केली आहे. तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर व सदस्य तथा सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्यांचे मंदिर परिसरातील फोटो व CCTV फोटेज विनापरवानगी प्रसारित करून श्री. बगाटे व त्यांचे कर्मचारी यांनी अध्यक्ष व सदस्य यांचा हेतू काय होता व त्या अनुषंगाने योग्य तपास होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती देखील सदर याचिकेत केली आहे.  सदर प्रकरणात मा. अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर यांनी देखील चौकशी आदेश दिली आहे.  त्याचा अहवाल मागण्याची विनंती देखील करण्यात अली आहे. 

  सदर बाबी लक्षात घेता  मा.  उच्च न्यायायालयाचे मा. न्या. एस.पी. देशमुख  व मा. न्या. एन बी सूर्यवंशी  यांनी  प्रतिवादी पोलीस प्रशासनाला नोटीस काढली.  पुढील सुनावणी ४ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.   सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर  शासनाच्या वतीने ऍड डी आर काळे, यांनी काम पाहिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News