विश्वहिंदू परिषदे तर्फे श्रावणी सोमवारी १२ महादेव मंदिरात महाआरती विश्वहिंदु परिषदेचा स्थापना दिन उत्साहाने साजरा


विश्वहिंदू परिषदे तर्फे श्रावणी सोमवारी १२ महादेव मंदिरात महाआरती     विश्वहिंदु परिषदेचा स्थापना दिन उत्साहाने साजरा

विश्वहिंदु परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त विजय शंकर महादेव मंदिरास भगवा ध्वज देण्यात आला. याप्रसंगी विजय शंकर मंदिराचे पुजारी राजेंद्र राजमाने,विश्वहिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष अँड.जय भोसले, जिल्हामंञी गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहमंञी गौतम कराळे,मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे, कोषाध्यक्ष मुकुल गंधे,शहरमंञी श्रीकांत नांदापुरकर,निलेश चिपाडे,अनिल देवराव,सुरेंद्र सोनवणे आदी.(छाया -अमोल भांबरकर)      

 अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -विश्वहिंदु परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त बजरंग दल व मठमंदिर समिती तर्फे  श्रावणी सोमवारी शुक्लेश्वर मंदिर,बेलेश्वर मंदिर,विजय शंकर महादेव मंदिर,भवानीनगर येथील नागेश्वर मंदिर,टिळकरोड येथील भोलेनाथ मंदिर,महाजन गल्ली येथील काळेश्वर महादेव मंदिर,काशी विश्वेश्वर महादेव मंदिर,दिल्लीगेट येथील स्वामी समर्थ मंदिरातील महादेव मंदिर,सदगुरु जयराम नाना मंदिर,सर्जेपुरा येथील पंचमुखी महादेव मंदिर,माळीवाडा येथील शिव गणेश मंदिर,सराफ बाजारातील सोमेश्वर मंदिर अशा नगर शहरातील १२ पुरातन महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.तसेच महादेव मंदिराला मठ मंदिर समितीतर्फे भगवा ध्वज देण्यात आला.याप्रसंगी प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,जिल्हामंञी गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहमंञी गौतम कराळे,मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,शहरमंञी श्रीकांत नांदापुरकर,निलेश चिपाडे,विशाल रायमोकर,अनिल देवराव,सुरेंद्र सोनवणे,विजय शंकर मंदिराचे पुजारी राजेंद्र राजमाने,सौ.शारदा  होशिंग,गणेश पलंगे,ओम नांदापूरकर,गौरव झंवर,मनोहर भाकरे,सोमेश्वर मंदिराचे पुजारी शर्मा,संजय देवळालीकर, प्रकाशसेठ लोळगे,गणेश मुंडलिक,योगेश नांगरे,विजय जगदाळे,स्वामी टाकळकर,शाम डहाळे,यश सावेकर,यश मुथा,आकाश  बुऱ्हाडे ,प्रमोद जांभळीकर,राम हुंडेकरी ,निखिल जगदाळे,विनायकसेठ नांदुरकर तसेच सराफ  बाजार मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्तिथ होते. सराफ बाजार येथील सोमेश्वर महादेव मंदिरात महाआरतीने समारोप करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सराफ  बाजार मित्र मंडळाच्या वतीने  खिचडीचे वाटप करण्यात आले.           याप्रसंगी प्रांत धर्मप्रसार प्रमुख मिलिंद मोभारकर म्हणाले कि,विश्वहिंदू परिषदेची स्थापना हिंदू धर्म रक्षणासाठी करण्यात आली आहे.विश्वहिंदू परिषद हि सेवा सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रीप्रमाणे समाज कार्य व धर्म कार्य करीत आहे.सर्व हिंदू बांधवाना विश्वहिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. देव देश आणि धर्मासाठी प्रत्येकाने कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.                                    

जाहिरात
Search
विडिओ
Recent News