दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान :- जयंत येलूलकर.


दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान :- जयंत येलूलकर.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) :-  दिवंगत कवियत्री संजीवनी खोजे यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यासाठी कवयित्री संजीवनी खोजे स्मृति कार्यक्रमाचे आयोजन केले असून यापुढे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले. रसिक ग्रुप, शब्दगंध साहित्यिक परिषद, व संजीवनी खोजे मित्र मंडळाच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे, लेखिका प्रा.  मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, सुरेश चव्हाण व दिलीप खोजे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना येलुलकर म्हणाले, संजीवनीला आपल्यातून जाऊन २९ वर्षे झाली. गेली २५ वर्षे त्यांच्या नावाने कवितेसाठी स्मृती पुरस्कार व कवितेचा जागर नगरमध्ये होत होता. हॉटेल संकेत चे संचालक  व सामाजिक, साहित्यिक जाणीव असणारे साहित्य रसिक शशिकांतजी मुथा यांनी सलग २५ वर्षे या कार्यक्रमासाठी मोठे योगदान दिले. यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नगरकरांचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भविष्यकाळात मसाप सावेडी शाखा, शब्दगंध साहित्यिक परिषद व रसिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार येईल असे येलूलकर यांनी यावेळी जाहीर केले. 

गेली २५ वर्षे संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार वितरण सोहळा व त्या निमित्त आयोजित कवी संमेलन कार्यक्रमास मोलाचे सहकार्य करणाऱ्या हॉटेल संकेत व तुषार गार्डन चे संचालक शशिकांतजी मुथा यांचा शाल, पुष्पगुच्छ व गणेश मूर्ती भेट देऊन कृतज्ञता पुर्वक सत्कार करण्यात आला. शशिकांत मुथा यांच्या वतीने त्यांचे नातू सी. ए.  सनित मुथा यांनी या सत्काराचा स्वीकार केला. यावेळी शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कवयित्री नीलिमा बंडेलु, ऋता ठाकूर, संगीता फासाटे व खोजे परिवाराचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डी. एम. कांबळे, प्रा मेधाताई काळे, चंद्रकांत पालवे, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगताद्वारे कवयित्री संजीवनी खोजे यांच्या गत स्मृतींना उजाळा दिला. शारदा होशिंग, व स्नेहल उपाध्ये यांनी संजीवनीच्या कवितांचे सादरीकरण केले. नीलिमा बंडेलु, संगीता फासाटे, ऋता ठाकूर, हेमलता पाटील, आरती होशिंग, सतीश डेरेकर, वसंत डंबाळे, मच्छिंद्र मालुंजकर, ल. धो. खराडे, हबीब पेंटर, दिलीप शहापूरकर, अमोल बागुल, राजेश सटाणकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. 

मान्यवरांच्या हस्ते संजीवनी खोजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला.  छायाचित्रकार दत्ता खोजे, किशोरी खोजे, राम गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास प्रा. डॉ. च. वि. जोशी, चित्रकार श्रीधर अंभोरे, नंदकिशोर आढाव, गजेंद्र क्षिरसागर, जालिंदर बोरुडे, शैलेश राजगुरू, कृष्णकांत लोणे आदी उपस्थित होते.राजेंद्र उदागे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाळासाहेब नरसाळे, संजय दळवी, सुदर्शन कुलकर्णी, विनायक वराडे, आरती होशिंग, ऋषिकेश येलूलकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 :- शनिवार ची रम्य सायंकाळ, कवयित्री संजीवनी खोजे यांचे तैल चित्रासमोरील समईचा मंद प्रकाश, कवी अमोल बागुल यांच्या बासरीचे आर्त स्वर आणि शारदा होशिंग व स्नेहल उपाध्ये यांच्या आवाजातील कवयित्री संजीवनी खोजे यांच्या भावपूर्ण कवितांचे सादरीकरण अशा वातावरणात हा सोहळा पार पडला. 


:- संजीवनी खोजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करतांना प्रा.  मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, सुरेश चव्हाण व दिलीप खोजे शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, जयंत येलूलकर, मार्गदर्शक ज्ञानदेव पांडुळे व इतर (छाया -: संजय दळवी.) 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News