तनपुरे कारखान्याचा लवकर तोडगा काढा, पुढील आंदोलनाची दिशा उग्र स्वरूपात-सुरेद्र थोरात


तनपुरे कारखान्याचा लवकर तोडगा काढा,  पुढील आंदोलनाची दिशा उग्र स्वरूपात-सुरेद्र थोरात

विखे यांच्या लोणी येथील बगल्यावर आदोलन-रावसाहेब खेवरे* 

राहुरी फॅक्टरी

महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी-विजय एस भोसले

गेल्या ८ दिवसापासून तनपुरे कारखाना थकीत पगारप्रश्नी  कामगारांचे आंदोलन सुरु आहे. कारखान्याचे सत्ताधारी डॉ.सुजय विखे व संचालक मंडळ यांच्याकडून सकारात्मक प्रस्ताव येत नसल्याने आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे.


कामगारांच्या समर्थनार्थ रिपाई आठवले गट जिल्हा ध्यक्ष सुरेद्र भाऊ व राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर- मनमाड मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे व शिवसैनिकानी ही सहभाग नोंदविला होता.


 कामगाराच्या कामाचे व प्रोव्हिडन्ट फडातील  कष्टाचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजे. अन्यथा आम्ही राहुरी तालुका बंद ठेवून राज्यभर रिपाई व शिवसेना एकत्र येऊन  तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा रिपाई आठवले गट जिल्हा ध्यक्ष सुरेद्र भाऊ यांनी दिला.


डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम कायदे मंत्री होते. त्यांनी कामगार यांच्या साठी बनवून प्रायव्हेट फडाची भविष्यात उपयोग होण्यासाठी घटनेत तरतुद करुन ठेवली त्याची अमलबजावणी होणे गरजेचे आहे असे जिल्ह्य उपाध्यक्ष  बाळासाहेब जाधव या वेळी म्हणाले. 


या रास्ता रोको चे आयोजन रिपाई तालुका ध्यक्ष विलास नाना साळवे यांनी केले असता  या वेळी ते म्हणाले की तनपुरे सह.कारखान्याशी सलग्न असलेल्या आयुर्वेद,फार्मसी,इंजिनियरीग संस्था आहेत तसेच कारखान्यांच्या विक्रीतील भंगार माॅलिशस यातुन देखील कामगारांचे देणे संचालक देऊ शकत नाही का.खा. सुजय विखे यांना  फक्त  खाजदार म्हणुन निवडुन येण्यासाठी कारखाना ताब्यात घेतला आहे का असा प्रश्न उभा केला. 


---------------------------------------------------------

*सोमवारी सकाळी रिपाई आठवले गट  व शिवसेना यांनी नगर-मनमाड रस्त्यावर उतरून सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करून कामगारांना समर्थन दिले आहे. दोन दिवसात कामगारांच्या हिताचा  योग्य तो निर्णय न घेतल्यास विखेंच्या घरासमोर आंदोलन करू कामगारांनी घाबरुन जाऊ नये अजुन ही वेळ गेली नाही - शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे*  

-------------------------------------------------------

या आंदोलनात कुमार भिंगारे इंद्रभान पेरणे, सचिन काळे, बाबासाहेब मुसमाडे, भागवत मुंगसे, संतोष चोळके, रिपाई जिल्हा ध्यक्ष  महिला आघाडीच्या सीमाताई बोरुडे, स्नेहल सांगळे, सीमा बोरुडे, स्नेहल सांगळे, बाबासाहेब मुसमाडे, भागवत मुंगसे, दिपक त्रिभुवन, कुमार भिंगारे, सुनिल चांदणे, नविन साळवे, संतोष चोळके, अतुल त्रिभुवन, प्रदीप भोसले, संतोष आल्हाट, संतोष दाभाडे, छोटु पडघडमल, बाळासाहेब पडांगळे, नेल्सन कदम, पविण पाळंदे, निलेश त्रिभुवन, कुंदन आरवडे, सलीम शेख, तुषार दिवे, किशोर पंडीत, ज्ञानेश्वर खिलारी, पन्नालाल गायकवाड, पंच्छी शिरसाठ, रुपक साळवे, सचिन डहाणे 

आदींसह भीमसैनिक रिपाई कार्यकर्ते , शिवसैनिक व कामगार सहभागी झाले.  या आंदोलन वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्यावतिने सहायक पोलिस निरीक्षक शँकरसिंग रजपूत यांनी निवेदन स्वीकारले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News