तब्बल दोन दशक प्रतीक्षेत गेले..तीन वर्षात मात्र कुकडी-सिनाचे पुनरुज्जीवन झाले


तब्बल दोन दशक प्रतीक्षेत गेले..तीन वर्षात मात्र कुकडी-सिनाचे पुनरुज्जीवन झाले

आ.रोहित पवारांनी पाठपुरावा करून सिंचन व बिगरसिंचनसाठी आणला भरघोस निधी

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - 

दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेल्या कुकडी व सिनाच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केलेला पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे कर्जत-जामखेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे भाग्य उजळले आहे.कित्त्येक वर्षे रखडलेली भु-संपादनाची रक्कमही शेतकऱ्यांना मिळवुन देण्यात त्यांना यश आले आहे. सन २०१९-२० ,२०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षांच्या कालखंडात तर शेकडो कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या मंजुऱ्या मिळवुन व सर्व कामे दर्जेदारपणे पुर्ण करून कुकडी आणि सिनाचे आ. रोहित पवारांनी "ना भुतो ना भविष्य" केलेले पुनरुज्जीवन मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणातही मान उंचावणारे आहे.कुकडी व सिनाबाबत असलेल्या अडचणी समजुन घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक शासकीय अधिकारी,सिंचन भवन ते थेट मंत्रालयापर्यंत बैठका घेऊन केलेला पाठपुरावा आज प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा देणारा आहे.जलसंपदा विभाग,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत कर्जत व जामखेड येथे सिंचन प्रापनसुची अंतर्गत आणि बिगर प्रापनसुची अंतर्गत कुकडी-सिनाची रखडलेली आणि नवीन प्रस्तावित शेकडोहुन अधिक कामे मार्गी लावण्यात आली.

        कर्जत तालुक्यातील सन २०१९-२० मध्ये बिगर सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना धरण सा. क्र.२/५८० ते ८०० अष्मपटलाची दुरुस्ती,सिना शाखा कालवा २/००० ते २/२३० मधील अष्मपटल व बांधकाम दुरुस्ती,सिना धरण एल ड्रेन व क्रॉस ड्रेनच्या अष्मपटलाची दुरुस्ती,सिना धरणाच्या संरक्षण भिंतींची दुरुस्ती,सिना उजवा कालवा किमी ३०/८८५ येथील सुपर पॅसेजचे काम दुरुस्ती,ल.पा. तलाव गुरवपिंप्री व बहिरोबावाडी येथील अष्मपटलाची दुरुस्ती,ल.पा. तलाव थेरगाव सांडवा,मुख्य विमोचक व इतर दुरुस्ती,दिघी निमगाव डाकू, चौंडी,निमगाव गांगर्डा येथील को.प.बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे व बसवणे व त्यास रंगकाम ही कामे करण्यात आली आहेत. सन २०१९ -२० मध्ये सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना उजवा कालवा सा. क्र.४/३०० ते ४/५१० अष्मपटल दुरुस्ती,सिना उजवा कालवा किमी ४२ मधील अष्मपटल दुरुस्ती,सिना धरण व कालवा येथील कामांसाठी तांत्रिक व आतांत्रिक मनुष्यबळ पुरवणे,ल.पा. तलाव गुरवपिंप्री आणि थेरवडी धरणाची देखभाल दुरुस्ती आदी कामे पार पडली. तर सन २०१९-२० मध्ये कुकडी डावा कालवा किमी क्र.१८० दुरगाव एस्केप बांधकाम व दुरुस्ती,कुकडी डावा कालवा येसवडी शाखा मायनर नं.२ बांधकाम व दुरुस्ती,कुकडी डावा कालवा येसवडी शाखा थेट विमोचक उजवे १,डावे १,२,३ बांधकाम दुरुस्ती,कुकडी डावा कालवा कोपर्डी एस्केप सा.क्र.१६७/४८० येथील गॅबीयन भिंत बांधणे,कुकडी डावा कालवा येसवडी चारी,पिंपळगाव चारी किमी ६, किमी ८, किमी ९ मधील भराव दुरुस्ती,राशीन, करमणवाडी येथील को.प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे,बसवणे व त्यास रंग देणे ही कामे करण्यात आली. सन २०१९-२० मध्ये सिंचन प्रापनसुची अंतर्गत कुकडी डावा कालवा येसवडी चारी किमी १ व २ दुरुस्ती करणे,कुकडी डावा कालवा चारी क्र.१५ किमी ८,९,१० दुरुस्ती,कुकडी डावा कालवा येसवडी चारी किमी ५,६,७ दुरुस्ती,कुकडी डावा कालवा चारी क्र.१५ किमी ३,४ दुरुस्ती,कुकडी डावा कालवा किमी १६५ ते १९४ अंतर्गत कामांसाठी तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळ पुरवणे,ल.पा. तलाव येसवडी धरणाची देखभाल दुरुस्ती,ल. पा. तलाव दूरगाव अष्मपटल दुरुस्ती ही कामे झाली. तर सन २०२०-२१ मध्ये बिगर सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना उजवा कालवा वरील अष्मपटल दुरुस्ती व बांधकाम दुरुस्ती,सिना उजवा कालवा क्र.४८/६७५ मधील जलसेतूची दुरुस्ती,सिना उजवा कालवा किमी.१७/८४५ (गवारे वस्ती) पुल बांधकाम,सिना उजवा कालवा किमी ००/०० ते २२/३०० पुलाच्या बांधकामाची दुरुस्ती,सिना उजवा कालवा किमी ०/००० ते ७३/००० मधील विमोचकाची दुरुस्ती व बांधकाम,सिना उजवा कालवा किमी ०/००० ते१३/००० मधील विमोचकाची  दुरुस्ती व बांधकाम,सिना उजवा कालव्यावरील स्वयंचलित मापक यंत्र बसवणे,काटनियामकाची दुरुस्ती,दिघी, निमगाव डाकू,चौंडी,निमगाव गांगर्डा को. प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे व बसवणे ही कामे झाली. सन २०२०-२१ मध्ये सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना धरणाच्या गाईड बंडवरील अष्मपट दुरुस्ती करणे,सिना उजवा कालवा सा. क्र.६/२४० ते६/४५० मधील अष्मपट दुरुस्ती व बांधकाम दुरुस्ती,कुकडी डावा कालवा किमी १६५ मध्ये स्वयंचलित मापक यंत्र बसवणे,राशीन करमणवाडी को. प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे,बसवणे व त्यास रंगकाम ही कामे करण्यात आली आहेत. तसेच सन २०२१-२२ मध्ये बिगर सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना धरण उजवा, डावा कालवा केबिन दुरुस्ती,शटर, रॉक टो,गंजरोधक काम आदी,को. प. बंधारा निमगाव डाकू स्तंभांची दुरुस्ती व गाईडफ्रेम बसवणे,दिघी, निमगाव डाकू,चौंडी, निमगाव गांगर्डा येथील को.प. बंधाऱ्यांचे लोखंडी बर्गे काढणे,बसवणे व त्यास रंग देणे,ल. पा. तलाव टाकळी खंडेश्वरी,बहिरोबावाडी,गुरव पिंप्री व थेरगाव सांडवा दुरुस्ती व अष्मपटल दुरुस्ती ही कामे झाली. सन २०२१-२२ मध्ये सिंचन प्रापनसुची अंतर्गत सिना धरण आवर्तन कालावधीत बाह्य अभिकरणाद्वारे सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी व रोजंदारी अस्थापणेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे व अवर्तनासाठी वाहने तसेच जेसीबी पुरवणे ही कर्जत तालुक्यातील कामे पाठपुराव्यातून मार्गी लागली आहेत.कर्जत तालुका वर्षानिहाय मंजूर केलेली व प्रस्तावित कामे:

सन २०१९-२० मध्ये ११२.६९ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून पुर्ण करण्यात आली.

सन २०२०-२१ मध्ये १२९.५१ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून पुर्ण करण्यात आली.

सन २०२१-२२ मध्ये ५७३.७८ लक्ष रुपयांची कामे मंजुर केलेली आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News