आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथील भाजपा नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथील भाजपा नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात सुरू केलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मधे आधीपासूनच प्रवेश केला आहे. आणि अजून अणेक कार्यकर्ते  आमदार पवार यांच्या विकासात्मक कामांचा व धोरणांचा विचार करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची साखळी सुरुच असून . आ पवार यांच्या विकासाच्या वाटेला साथ देण्यासाठी दिनांक ३० आॅगष्ट रोजी कर्जत येथील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशात प्रामुख्याने राजकीय चाणक्य संबोधले जाणारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, गायकरवाडी येथील उद्योजक व कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक लालासाहेब शेळके, बिल्डर क्षेत्रातील व्यावसायिक नितीन तोरडमल आणि कर्जत मल्टीपर्पज सोसायटीचे व्हाईस चेअरमन देविदास खरात यां सर्वांनी आज आमदार रोहित पवार यांच्या साक्षीने पुणे येथील आमदार रोहित पवार यांच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी दिली. या भाजपच्या सर्व नेत्यांना भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी  शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वेळी शेलार म्हणाले की या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आता शहरात राष्ट्रवादीची ताकद चांगली वाढणार असून याचा फायदा  नगरपंचायतच्या येणाऱ्या निवडणूकीत होईल असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. या नेत्यांनी राष्ट्रवादीत  प्रवेश करताना कोणत्या ही अटी किंवा मागण्या केल्या नाहीत. फक्त आ पवार यांनी सुरू केलेल्या विकास कार्याला साथ देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची भावना प्रसाद ढोकरीकर यांनी बोलून दाखविली. यावेळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे, कुंबेफळचे सरपंच संतोष नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 राष्ट्रवादीच्या गळाला कर्जत येथील मोठा (राजकीय) मासा लागल्याची चर्चा सोशियल मिडीयावर चांगलीच गाजत आहे. परंतु हा (नेता) मासा राष्ट्रवादीच्या गळाला  लागण्या आधी काही शर्ती व अटींवर राष्ट्रवादीच्या गोटात जाऊ  शकतो. आणि या घडामोडी  येत्या काही दिवसांत घडतील. आणि या   नंतर इतर अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळतील  !

जाहिरात
Search
विडिओ
Recent News