रक्षाबंधन दिवशी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या गोरे होमगार्डच्या कुटुंबीयांना मदतीचा हात, मासाळवाडी ग्रामस्थांचे मदतीचे आवाहन


रक्षाबंधन दिवशी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या गोरे होमगार्डच्या कुटुंबीयांना मदतीचा हात, मासाळवाडी ग्रामस्थांचे मदतीचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील होमगार्ड प्रशांत प्रकाश गोरे (वय-२६) याचा रविवार दि. २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशीच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रशांतच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्यास सर्वांनी सढळ हाताने मदत करावी यासाठी मासाळवाडीतील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.

        होमगार्डचे काम नसताना प्रशांत हा त्याचा पिढीजात पारंपारिक व्यवसायातील वाद्यकाम करीत असे, परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे लग्नसराई बंद असल्या कारणाने त्यांचा हा व्यवसाय बंद आहे त्यामुळे त्याची आर्थिक घडी विस्कटली होती व आहे.

प्रशांत याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते व त्यांना एक लहान मुलगी आहे. प्रशांत यांच्या हालाखीची परिस्थिती लक्षात घेता माणुसकीच्या नात्याने मासाळवाडी, तरडोली, पळशी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी येथील राजकीय, सामाजिक, व्यवसायिक, शेतकरी, ग्रामस्थ, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन, बारामती होमगार्ड अशा विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तीं सढळ हाताने गोरे यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम स्वरूपात मदत करीत आहेत. 

    राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशांत गोरे यांच्या घरातील व्यक्तीला शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नोकरी द्यावी यासाठी जिरायत भागातील पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन पवार यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवावा असे ठरविण्यात आले.

       याप्रसंगी प्रशांतच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी मासाळवाडी, तरडोली, पळशी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी आदी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी- माजी पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News