: लोणी व्यंकनाथ येथे "बीग बास्केट" च्या फळे व भाजीपाला खरेदी केंद्राचा शुभारंभ : तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार देशातला सर्वोच्च भाव


: लोणी व्यंकनाथ येथे "बीग बास्केट" च्या फळे व भाजीपाला खरेदी केंद्राचा शुभारंभ : तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार देशातला सर्वोच्च भाव

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी दि.२९:  लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा येथे टाटा गृपशी संलग्न असलेल्या "बीग बास्केट" या आघाडीच्या देशव्यापी नामवंत ई-कॉमर्स कंपनीच्या फळे व भाजीपाला खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवार दि.२९ रोजी संपन्न झाला.

        श्रीगोंदा तालुक्याला संपूर्ण देशात लिंबाचे आगार म्हणून ओळखले जाते. श्रीगोंदयाचे लिंबू सेंद्रिय व गुणवत्तापूर्ण  उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे .लोणी व्यंकनाथ, बेलवंडी , चिंभळे, हंगेवाडी, श्रीगोंदा, बाबुर्डी , शिरसगाव बोडखा, मढेवडगाव, पारगाव सुद्रीक , घारगाव, वडाळी, बेलवंडी व अनेक महत्वपूर्ण गावांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळांचे उत्पादन होते.  बीग बास्केट कंपनीने तालुक्यात दोन महिने सर्वे करून खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील भाजीपाला व फळे  शहरातील ग्राहकांपर्यंत ऑनलाइन मागणीप्रमाणे थेट पोहोचतील व संपूर्ण देशात असलेला सर्वोत्तम भाव मिळून  शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी येणार आहे. बाबूर्डी येथील प्रगतशील शेतकरी कुंडलिक शिर्के सर व त्यांचे उच्चशिक्षित मुले प्रमोद व अतुल यांनी बीग बास्केट कंपनी खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे. 

     या शुभारंभ कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विनोद भोसले व अभिजीत भोसले यांनी सांगितले की गुणवत्तापूर्वक उत्पादन  रास्त भावात खरेदी करण्यावर कंपनीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तसेच कंपनी भविष्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादन व खरेदी यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना देशी-परदेशी भाज्या, फळझाडे यांचे सर्वोत्कृष्ट बियाणे, खते व पीक व्यवस्थापन यांच्यासाठी मदत करणार आहे. 

   या शुभारंभ कार्यक्रमाला नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर,  बाळासाहेब नाहाटा, गणपतराव काकडे, जिजाबापू शिंदे, सुभाषराव शिंदे, अँड विठ्ठलराव काकडे, वैभव पाचपुते, सचिन कदम, विलासराव काकडे, विष्णुपंत जठार, अँड बाळासाहेब काकडे, आप्पासाहेब काकडे, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब जगताप, राजेंद्र काकडे, टिळक भोस, मोहनराव काकडे, पोपटराव खोमणे, मनेष जगताप, सुनील पाटील, ज्ञानदेव मगर, संजयराव नलगे, पिंटू बोडके, माऊली हिरवे, भगवानराव खेतमाळीस, खंडू हिरवे,संभाजी हिरवे,  संतोष गायकवाड, रमजान हवालदार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी लोणी व्यंकनाथ, पारगाव, बाबुर्डी बेलवंडी, चिंभळा,हंगेवाडी, मढेवडगाव परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News