सासवड पोलीसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई


सासवड पोलीसांची अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई

सासवड पोलीसांनी अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई करीत दोन जणांवर गुन्हा दाखल करीत एकूणन 16,072/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

       पुरंदर तालूक्यातील सासवड पोलीस स्टेषनच्या हद्दीमध्ये केतकावळे येथील हॉटेल भाग्यश्री तसेच  चिव्हेवाडी येथील हॉटेल गारवा मध्ये अवैध देषी-विदेषी दारू विक्री करणाÚया दोन इसमांवर सासवड पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक श्री.आणासाहेब घोलप यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस उप निरीक्षक व्हि.सी.झिंजुर्के व डी.बी पथकाने कारवाई करून मोठा दारूचा साठा जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक निलेष जाधव, व पो.ना. हिप्परकर यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती मिळाली.


       काषीनाथ रामभाउ पांगारकर हॉटेल भाग्यश्री रा. केतकावळे तसेच संभाजी मारूती कदम हॉटेल गारवा चिव्हेवाडी रा. भिवडी ता-पुरंदर जि पुणे अषी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. छापा कारवाईमध्ये हॉटेल भाग्यश्रीमधून मॅगडॉल नं 1 च्या 11 बाटल्या,इंपिरीयल ब्ल्यू 13 बाटल्या, टॅंगो पंच 64 बाटल्या अषा एकूण 6740/- रूपये किंमतीचा देषी विदेषी दारूचा साठा जप्त केला. त्याचप्रमाणे हॉटेल गारवा मधून रॉयल स्टॅग 21 बाटल्या, इंपिरीयल ब्ल्यू 33 बाटल्या, टॅंगो पंच 20 बाटल्या एकूण 9332/- रूपये किंमतीचा माल. अषा प्रकार दोन हॉटेलवर कावाई करून एकूण 16,072/- रूपये किंमतीचा मुद्देमामल जप्त केला असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक श्री.आण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.

       सदरची कारवाई सासवड पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक श्री.आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्षनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक व्हि.सी.झिंजुर्के, पो.ह. लडकत,पो.ना. हिप्परकर,पो.ना जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News