कै.करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यतिथी निमित्त कोपरगावमध्ये नेत्र तपासणी शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी घेतला लाभ


कै.करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यतिथी निमित्त कोपरगावमध्ये नेत्र तपासणी शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी घेतला लाभ

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर 

कोपरगाव येथील माजी. नगरसेवक कै.करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यातिथीनिमिताने आनंदऋषी जी नेत्रालय अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मित्रा फाउंडेशन यांच्या माध्यमातुन मोफत डोळे तपासणी शिबिराचे उद्धाटन कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आरिफ भाई कुरेशी यांच्या हस्ते २७ ऑगष्ट २०२१ रोजी फित कापून करण्यात आले.

            सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. नसिर कुरेशी, अल्ताफ कुरेशी, डॉ. देशमुख ( पॅथॉलॉजी लॅब),बशिर गफुर कुरेशी, मुबशिर खान सर त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने रूग्ण उपस्थित होते.

           डॉ. नसीर कुरेशी यांनी सांगितले कि, मोफत नेत्र तापासणी शिबीरात जवळपास साडेचारशे ते पाचशे रुग्णांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली पैकी ७३ रुग्णांना चष्म्याचे मापक दरात वाटप करण्याात आले व १५ मोतीबिंदु रुग्ण आढळुन आले त्यांना ऑप्रेशनसाठी त्यांच्या सोयीनुसार संत जनार्दन स्वामी हॉसिटल कोकमठाण आणि आनंदऋषी जी नेत्रालय अ.नगर येथे पाठविण्यात आले आहे. 

        सदर कार्यक्रमासाठी जुबेर करिम कुरेशी, जुनेर कुरेशी (इंजि), तौफिक कुरेशी ( इंजि) यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

        या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उर्दु शाळेच शिक्षक दस्तगीर कुरेशी यांनी केले व  शेवटी आभार मुबशिर खान सर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News