नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा -अजित पवार


नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा -अजित पवार

पुणे: अजित पवार यांनी नारायण राणे यांच्या वरआज परत   भाष्य केले.मला नारायण राणे बाबत चर्चा करायची नाही. त्याच त्यांना लकलाभ आम्हाला सरकार चालवायच आहे . ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनी त्याच काम करावं .असे अजित पवार म्हणाले.

आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतो.एकीकडं केंद्र सरकार सांगत कोरोना काळजी घ्या आणि नवीन चार मंत्री झाले त्यांना सांगत यात्रा काढा. याला कोण जबाबदार नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा.असाही तोला त्यांनी नारायण राणे यांना अजित पवार  यांनी  पुण्यातील पत्रकार परिषदे मध्ये  लगावला.

मला अनिल देशमुख बाबत रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत मी यावर बोलणार नाही.अनेक चौकश्या होत असतात त्यावेळी सगळ्यानी चौकशीसाठी बोलवत असतात त्यामुळे यावर बोलणार नाही. असे बोलून अजित पवारांनी अनिल देशमुख यांचा वर बोलणे टाळले.

पीएमआरडीए बाबत पार पडली,एक बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाली होती,त्याबाबतीत आज खासदार ,आमदारांना एक ड्राआफ्ट दाखवला.अनेकांनी सूचना दिल्या दाखवल्या.अजून एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्या बाबत चर्चा होईल.पुणे आजूबाजूचा परिसर वाढतच आहे. त्यामुळं भविष्यात जर नवीन महापालिका करायची झाली तर त्याबाबत नियोजन करायच त्याबाबत चर्चा झाली अशी माहिती आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकाराना पुण्यात दिली.

२३ गावाबाबत आता जरी पीएमआरडी  ने केलं असेल .तर ते पुणे महापालिका कडे हस्तांतरण करायच असेल. तर याबाबत पुणे महापालिका बघेल,.दोन्ही महापालिका भाजप च्या ताब्यात असल्या तरी विकासाबाबत राजकारण केलं जातं नाही,याबाबत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत असेही अजित पवार म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News