कला म्हणजे निसर्ग आणि कलाकार म्हणजे निसर्गाचे देण आहे ती कला जपणे आपल्या हातात आहे-बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी


कला म्हणजे निसर्ग आणि कलाकार म्हणजे निसर्गाचे देण आहे ती कला जपणे आपल्या हातात आहे-बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी

पुणे दि.२८-कला म्हणजे निसर्ग आणि कलाकार म्हणजे निसर्गाचे देण आहे ती कला जपणे आपल्या हातात आहे .त्यासाठी कलाकारांना शासनाने भरीव मदत करावी व त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे  व कलाकारांसाठी  महामंडळ निर्माण करून सरकारने कलाकारांची नोंद ठेवून त्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या कलेचा लाभ मिळावा व त्याना वैद्यकीय सुविधा ,मानधन ,विमा ,कलासाहित्य उपलब्ध करून देण्यात यावे . असे उदगार बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.                      विद्यानगर ,पुणे येथ अराओके आर्टिस्ट फोऊंडेशन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी २५० कलाकारांना ऍड.रेणुका चलवादी यांच्यावतीने  अन्नधान्य किट्स व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांनी आपापली कला सादर केली.यावेळी आखील भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते चलवादी यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यसम्राट पुरस्काराने गौरविण्यात आले तशेच कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या कलाकाराना कोविड योद्धा पुरस्काराने रेणुका चलवादी व इतर मान्यवरांचा हस्ते सन्मानित करण्यात आले .यावेळी रुबी हॉल क्लीनिक यांच्यवतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तशेच न्यू इंडिया कंपनीच्या विम्याचे फॉर्म भरून घेण्यात आले . यावेळी सुदीप गायकवाड यांची बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी घास या चित्रपटाचे उदघाटन व आरावोके याच्या बोर्डाचे उदघाटन चलवादी यांच्या हस्ते करण्यात आले . व्यासपीठावर अमर पुणेकर ,रुपाली आवचरे ,क्रांतीनाना मळेगावकर ,लॉरेन्स जोसेफ ,आरओके चे अध्यक्ष पी.चंद्रा ,सचिव शिवाजी वाघमारे  ,मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा चे अशोक सराफ ,के.टी. सुर्यवंशी , सुरेखा वाघमारे ,चित्रसेन भवार ,मिठू पवार ,संजय लोंढे ,प्रशांत बोगम ,आप्पा कांबळे ,दत्ता शिंदे आदी कलाकार उपस्थित होते. कलाकारांनी गायन ,पोवाडे ,दोलकी वादन ,लावणी सादर केली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रेणुका चलवादी यांच्याबरोबर आरओके च्या  चंद्रा पवार ,शिवाजी वाघमारे  ,धनश्याम अग्रवाल हेमंत उतेकर व इतर सर्व कलाकारांनी मेहनत घेतली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News