फायर अॅखन्ड सेफटी असोशिएशन ऑफ इंडीयाच्यावतीने फिस्ट पुरस्कार प्रदान..


फायर अॅखन्ड सेफटी असोशिएशन ऑफ इंडीयाच्यावतीने फिस्ट पुरस्कार प्रदान..

जीवन सुखकर होण्यासाठी ते अधिक सुरक्षित असणे गरजेचे– खा. गिरिष बापट

लोकांमध्ये आग प्रतिबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीच्या उद्धेशाने फायर अॅन्ड सेफटी असोशिएशन ऑफ इंडीयाच्या वतीने पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतामध्ये 24 शहरांमध्ये फायर सेक्युरीटी यात्रा अंतर्गत विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले.

पुण्यातील कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईनद्वारे खासदार गिरिष बापट यांच्या हस्ते तर फिस्ट पुरस्कारांचे वितरण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व व्हीके ग्रुपचे अध्यक्ष विश्वास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि पुणे मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांचा सन्मान करण्यात आला.

एफएसएआयचे पुणे अध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, सल्लागार त्रैलोकनाथ तिवारी, महेश गव्हाणे, उपस्थित होते. 

कोरोनाकाळात हॉस्पिटलमध्ये झालेल्या आगीच्या घटना महाराष्ट्र विसरु शकला नाही. त्यामुळे अग्नि प्रतिबंधक सुरक्षा विषयात अधिक संशोधन होण्याबरोबर शैक्षणीक उपक्रमांमध्ये याविषयाचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार गिरिष बापट यांनी केले. 

वृद्ध, गर्भवती, लहान मुलांच्या सुखकर भविष्यासाठी निवासी किंवा औद्योगिक बांधकामावेळी अग्निप्रतिबंध आणि सुरक्षिततेचा आग्रह धरण्याची गरज असल्याचं पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संगितलं


बांधकाम व्यवसायिकांनी केवळ पैसे कमावणे हा उद्देश न ठेवता केलेल्या कामाचा अभिमान आणि समाधान लाभण्याचे उदिष्ठ ठेवावे. बांधकामामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आर्किटेक्ट्सनी आग प्रतिबंध उपाययोजना जास्तीत जास्त राबविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन जेष्ठ आर्कीटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News