प्रवीण बढेकर यांना आम्ही अभिनवकर या अभिनव विद्यालय माजी विद्यार्थी शिक्षक,व शिक्षकेतर संघ यांचा “अभिनव रत्न”हा पुरस्कार पुण्याचे महापौर मा.मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते प्रदान


प्रवीण बढेकर यांना आम्ही अभिनवकर या अभिनव विद्यालय माजी विद्यार्थी शिक्षक,व शिक्षकेतर संघ यांचा “अभिनव रत्न”हा पुरस्कार पुण्याचे महापौर मा.मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते प्रदान

पुरस्कारार्थी व मान्यवर यांचे समूह चित्र.

प्रवीण बढेकर यांना आम्ही अभिनवकर या अभिनव विद्यालय माजी विद्यार्थी शिक्षक,व शिक्षकेतर संघ यांचा “अभिनव रत्न”हा पुरस्कार पुण्याचे महापौर मा.मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच माजी शिक्षिका सौ. उर्मिला देव यांना “अभिनव कृतज्ञता पुरस्कार” तर श्री.कृष्णा घुमरे यांना “अभिनव कृतज्ञता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफल.पुष्पगुच्छ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मनोहर मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पीतांबर पाटील(अध्यक्ष),कुलदीप सावळेकर( कार्यवाह),संजय वर्पे(कार्याध्यक्ष),शिरीष पुराणिक (उपाध्यक्ष),श्री जोशीराव सर प्रमुख पाहुणे,मृणाल खर्चे,तुषार हळबे,शोभना माथवड आदी मान्यवरांच्या बरोबरच माजी शिक्षक,कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्ति कितीही मोठी झाली तरी शिक्षकांना विसरत नाही असे संगितले. सत्काराला उत्तर देताना प्रवीण बढेकर यांनी आपल्या यशात आपल्यावर विविध गुणांचे संस्कार करणार्‍या विविध शिक्षकांचा यात मोठा वाटा आहे असे संगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गायके यांनी केले. आभार प्रदर्शन शिरीष पुराणिक यांनी केले.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News