इकोल स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


इकोल स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पुणे :

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने इकोल स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 30 ऑगस्ट पासून 8 सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे अशी माहिती इकोल स्पोर्ट्स फौंडेशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे संचालक दर्शन जिंदाल यांनी पत्रकार परिषदेत दिली

या स्पर्धेत पीवायसी ,डेक्कन जिमखाना ,पूना क्लब डिव्हीसीए, ब्रिलीयंट,अंबिशियस,केडनस,22 यार्ड्स ,मेट्रो व जिल्हा संघ असे 10 संघ सहभागी असणार असून ही स्पर्धा राऊंड रॉबिन प्रकारात होणार आहे ही स्पर्धा पूना क्लब,येवलेवाडी, पी, डेक्कन जिमखाना, डिव्हीसीए या ठिकाणी होणार आहे ,अशी माहिती सयन सेनगुप्ता यांनी दिली. स्पर्धेला सेव्हन बाय एमएस धोनी ,लायन क्लब ऑफ पुणे ,मास्टरमाईंड आदींचे सहकार्य लाभले असून गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंना याद्वारे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे असा विश्वास महेश देशमुख यांनी व्यक्त केला यावेळी इकोल स्पोर्ट्स फौंडेशनचे सचिव सयन सेनगुप्ता ,संचालक महेश देशमुख, लायन क्लब ऑफ पुणे ,मास्टरमाईंडचे अध्यक्ष नसरीन एंजलर,अंशुल शर्मा ,पोरस अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News