प्रहार अपंग कांती आंदोलनाच्या वतीने दिव्यांग कल्याण आयुक्तालया समोर रक्तदान आंदोलन


प्रहार अपंग कांती आंदोलनाच्या वतीने दिव्यांग कल्याण आयुक्तालया समोर रक्तदान आंदोलन

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर


प्रहार अपंग क्रांती आंदोलन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्तलया समोर  रक्तदान आंदोलन करण्यात आले. सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या संदर्भातील राजपत्रित अधिसूचना 18 ऑगस्ट 2019 ला जाहीर केली यानुसार दिव्यांगांना पोलीस दल रेल्वे संरक्षण दल यासारख्या सरकारी सेवांमधील नियुक्त्यांमध्ये चार टक्के मिळणारे आरक्षण रद्द करण्यात आले या निर्णयामुळे भारत देशातील लाखो दीव्यांग बांधवांवर अन्याय होणार असल्याचे धर्मेंद्र सातव यांनी सांगितले कोरोना मुळे देशातील दिव्यांगांचा रोजगार गेला आहे उद्योगधंदे बुडाले आहे या सर्व गोष्टींचा विचार करून धर्मेंद्र सातव आणि सर्व दीव्यांग बांधवांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची रक्त तुला यावेळी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आली. राज्याचे दिव्यांग कल्याण उपआयुक्त संजय कदम यांनी आदोलन स्थळी येऊन निवेदन स्विकारले. या रक्तदान आंदोलनात सुरेखा ढवळे, बाळू काळभोर, गणेश माने, सुप्रिया लोखंडे, रफिक खान, अनिल शिंदे, सुरेश पाटील, श्रीपती शिंदे, बापू कुडळे, संजय चव्हाण, अनिता कदम, आनंदराव गायकवाड, बाबा पडोळे, दिपाली वाघमोडे, प्रकाश लोखंडे, सुरेश पाटील,  शिवाजी शिंदे, जीवन टोपे, अनील मेमाने, दशरथ शिंदे आदी दीव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News