कोपरगाव येथील लायन्स मुक बधिर व अपंग विद्यालयास .. यांची सदिच्छा भेट


कोपरगाव येथील लायन्स मुक बधिर व अपंग विद्यालयास .. यांची सदिच्छा भेट

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर,

कोपरगाव येथील लायन्स मुक बधिर व अपंग विद्यालयास महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य व नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी सदिच्छा भेट दिली.आपल्या भेटी दरम्यान डॉ. तांबे यांची विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. नारायण डुकरे यांनी स्वागत केले, त्याचप्रमाणे विद्यालयाच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भास्कर गुरसळ सर्व शिक्षक, शिक्षेकेतर व  कर्मचारी उपस्थित होते.

             कोपरगाव तालुक्यातील मुक बधिर व दिव्यांगांना आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी लायन्स मुक बघिर व अपंग विद्यालयाची  १९८४साली स्थापना करण्यात आली. विद्यालयाची स्थापनेपासुन ते आजतागायत अनेक विद्यार्थ्यांनी गुरू ज्ञानातुन आपले भविष्य उज्वल केले आहे . विद्यालयाची गुणवत्ता आजपर्यंत टिकावण्याचे काम विद्यालयातील सर्वांनी केले आहे . परंतु .......?

       डॉ. तांबे यांच्या भेटीदरम्यान ७वा वेतन आयोग सुरू  करण्यासाठी टॅब सुरु करण्यासाठी मंत्रालयातुन प्रयत्न करावा, अर्धवेळ व अंशकालिन कंत्राटी कर्मचारी यांना ६वा व ७वा वेतन लागु करावा, त्यांच्यावरील अन्याय दुर करावा, त्याचप्रमाणे २००५ नंतर सेवेत रूजु झालेल्या कर्मचाऱ्यांचे अंशदायी पेन्सन मिळते डि सी पी एस मध्ये सुधारणा करून एन पी एस लागु करावा,संख्येचे अनुज्ञाप्ती नुतनीकरण प्रस्ताव तातडीने निकाली काढावे अशा  अनेक प्रश्नांबाबत शासन स्तरावर प्रयत्न व्हावे. जिल्हयातील दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांच्या समस्या  सोडविण्यासाठी जिल्हा समाजकल्याण कार्यालयात मिटिंग आयोजित करावी त्याचप्रमाणे दिव्यांगाचे विविध प्रश्न व संस्था कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील अनेक संघटना , पदाधिकारी,कर्मचारी यांची राज्यस्तरीय मिटिंग संगमनेर येथे आयोजित करावी हे वअसे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते नारायण डुकरे यांनी विद्यालयातील शिक्षक ,शिक्षिका व कर्मचारी यांच्या वतीने मांडले. कलाशिक्षक रमेश टिक्कल यांनी सांगितले कि , आपल्या प्रयत्नामुळेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला ७वा वेतन आयोग लागु करावा लागला याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिभा कांबळे यांचा वाढदिवस असल्याने डॉ तांबे यांनी  अभिष्टचिंतन केले .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News