वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात लोकहित रहदारी नियंत्रक समित्यांची निर्मिती करण्याची मागणी


वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी  शहरात लोकहित रहदारी नियंत्रक समित्यांची निर्मिती करण्याची मागणी

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाचे राज्यसरकारपुढे प्रस्ताव

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत )- वाहतुक कोंडीने सर्व नागरिकांचा जीव गुदमरला जात असताना वाहतुक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अहमदनगर शहरासह प्रत्येक शहरात लोकहित रहदारी नियंत्रक समित्यांची निर्मिती करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या इंडिया अगेन्स्ट अनागोंदीच्या माध्यमातून या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

शहरात सकाळी 9 ते दुपारी 12 व संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत प्रत्येक रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बर्‍याच वेळा ट्राफिक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे घाईगर्दी मध्ये पुढे जाण्याच्या नादात रहदारी ठप्प होते. तासनतास नागरिकांना वाहतुक कोंडीत अडकून मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. शहरातील रस्ते अरुंद व असल्याने दररोज वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत आहे. तर रहिवाशांना गाड्यांच्या धुरामुळ प्रदूषणाला तोंड द्यावे लागते. बर्‍याच वेळेला ज्येष्ठ नागरिक, महिलांना व लहान मुले वाहतुक कोंडीमध्ये अडकून पडतात. एकंदरीत ट्रॅफिक पोलिसांवर जनतेचे नियंत्रण नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.प्रत्येक शहरामध्ये रहदारीची अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे संघटनेने पुढाकार घेऊन अहमदनगरसह प्रत्येक शहरात  सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून लोकहित रहदारी नियंत्रण समिती उभे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. लोकसहभागाशिवाय रहदारी नियंत्रण सुरळीत होऊ शकणार नाही. या समितीच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सोडविता येऊ शकणार आहे. यासाठी संबंधित पोलिस अधिकार्‍यांना याबाबत सूचना करुन सामाजिक कार्यकर्ते, युवक व विशेषतः महिला होमगार्ड पथकांना अशा प्रकारच्या रहदारी नियंत्रणाचे काम देण्याची मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी पोलीस भरती करण्याची गरज न भासता मानधनाच्या रुपाने त्यांना रोजगार देखील मिळू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News