शिक्षिका व सेविका यांना 10 टक्के पगार वाढ देण्यात यावी वसंत मोरे यांची मागणी


शिक्षिका व सेविका यांना 10 टक्के पगार वाढ  देण्यात यावी वसंत मोरे यांची मागणी

पुणे: शिक्षण विभागाच्या प्राथमिक पुणे महानगरपालिकेने बालवाडी शिक्षिका व सेविका यांना दहा वर्षे पूर्ण झालेले आहे अश्या शिक्षिका व सेविका यांना लवकरात लवकर  10 टक्के पगारवाढ फरक त्वरित देण्यात यावा .अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी एका पत्राद्वारे महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे.

पगारवाढ देणाऱ्या ठराव मुख्य सभा ,स्थायी समिती, व महापालिका आयुक्त यांच्याकडून मान्य झालेला आहे.

तसेच सदर ठरावाची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.

पुणे महानगरपालिकेचे मुख्य सभेतही  सदर  ठरावास 

मान्यता मिळाल्याची असताना आपण का त्याची अंमलबजावणी करत नाही .याचे त्वरित कारण  द्यावे. अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News