कै. करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यतिथी निमित्त आनंदऋषी जी हॉस्पिटल अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मित्रा फाउंडेशन कोपरगाव यांच्या माध्यमातून


कै. करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यतिथी निमित्त आनंदऋषी जी हॉस्पिटल अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने  व मित्रा फाउंडेशन कोपरगाव यांच्या माध्यमातून

शिबिर 👁️ शिबिर 👁️ शिबिर 

 कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आनंदऋषी जी हॉस्पिटल अ. नगर यांच्या संयुक्त विद्यमाने व कै. करीमभाई कुरेशी यांच्या पुण्यतिथी निमित्त (स्मुर्ती दिना निमित्त ) मित्रा फाउंडेशन कोपरगाव यांच्या माध्यमातुन डोळे तपासणी शिबिर शुक्रवार दि. २७ /८ /२०२१रोजी सकाळी ९. ३० ते दु .२ वा.पर्यंत, उर्दु शाळा नं .४, आयेशा कॉलनी, सवेरा हॉटेल जवळ कोपरगाव येथे आयोजित केले आहे.

           शिबीराचे वैशिष्ट > ज्यांना डोळ्याचा त्रास होतो, ज्यांचे डोकं दुखते, मानेच्या शिरा दुखतात, चक्कर येते किंवा डोळ्यात पाणी येते, जवळचे व लांबचे कमी दिसते अशा सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे डॉ . कुरेशी यांनी आमच्या प्रतिनिधिशी  बोलतांना सांगितले.

      शिबीरात केस पेपरसाठी फक्त रु.१०आकारले जातील व तपासणी मोफत केली जाईल , संस्थेच्या वतीने कमी दरात चष्मा दिला जाईल, मोतीबिंदु असलेल्या नागरिकांचे आनंदऋषी नेत्रालय अहमदनगर तसेच श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव येथे ऑपरेशन करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वरील संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News