"सायंबाचीवाडी" चे उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल


"सायंबाचीवाडी" चे उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद दिलीप जगताप यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. 

      ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच मनमानी कारभार करणे आदी कारणास्तव सायंबाचीवाडीचे सरपंच हनुमंत किसन भगत, सदस्य गणेश विश्वास भापकर, शीतल नारायण भापकर आणि शारदा शांताराम भापकर यांनी याबाबत बारामतीचे तहसीलदार यांच्याकडे हा ठराव दाखल केला आहे. याबाबत तहसीलदार यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी काढलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, सायंबाचीवाडीचे उपसरपंच प्रमोद जगताप यांचेविरुध्द ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ अन्वये दिनांक २६/८/२०२१ रोजी अविश्वास ठरावाची नोटीस हनुमंत किसन भगत व इ.३ ग्रामपंचायत सदस्य सायंबाचीवाडी यांनी सादर केली असून सदरबाबत विशेष सभा दिनांक ०१/०९/२०२१ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय सायंबाचीवाडी, ता. बारामती येथे तहसिलदार बारामती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे असे तहसीलदार यांनी काढलेल्या नोटीसीत म्हटले आहे. याबाबत दि.१ सप्टेंबर रोजी मतदान घेऊन उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर होऊ शकतो.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News