कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेत कोर्सेस घेणाऱ्या महिला भगीनींच्या वतीने कर्जत पोलिसांना बांधल्या राखी


कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेत कोर्सेस घेणाऱ्या महिला भगीनींच्या वतीने कर्जत पोलिसांना बांधल्या राखी

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - श्रावणी पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला चांगले आरोग्य व भरपूर आयुष्य लाभावे म्हणून औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतिक म्हणून हातात राखी बांधतात . आणि भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू  देऊन बहिणीला आशीर्वाद देतात. रक्षाबंधन हे कित्येक वर्षांपासून चालत आलेला एक आपुलकीचा व बहिण भावाच्या नात्यातील प्रेमाचा उत्सव आहे. या दिवशी बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधायची असते यामागे बहिणीचा एक उद्देश असतो की आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे ही भूमिका असते. याच भावनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व जन शिक्षण संस्थान, अहमदनगर अंतर्गत कर्जत येथे सुरू असलेल्या ब्युटीपार्लर व फँशन डिझायनिंगच्या कोर्स मधील सर्व विद्यार्थी महिला मैत्रिणींना सोबत घेऊन कर्जत येथील प्रसिद्ध  कवी स्वाती पाटील यांनी कर्जत पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना राखी पौर्णिमेला रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते . एरव्ही चुकूनही पोलीस स्टेशनची  पायरी ही चढण्याचं धाडस न करणाऱ्या सर्व महिला मैत्रिणीं या उपक्रमात  उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या.  पोलीस बांधवांनी कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भुमिका बजावली आहे. खरंतर अहोरात्र कधीही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस बांधवांप्रती सन्मान व्यक्त करण्याच्या सदभावनेतून स्वाती पाटील यांच्या संकल्पनेतून या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी कर्जत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पो ऊ नि अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, बाळासाहेब यादव, बळीराम काकडे, गोवर्धन कदम, सुनील खैरे, सतीश सोनमाळी आदीसह  सर्व कर्मचारी बांधवांना या वेळी राखी बांधण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी व पोलीस बांधवांनी या भगिनींना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात 

स्वाती पाटील, शबनम मुंढे, आश्विनी घेरडे, सुनिता घालमे, सुरेखा माने, रजनी बरबडे, शिल्पा माळवे, वैष्णवी पठाडे,वनिता जगताप, शिल्पा राठोड आदी महिला भगीनी सहभागी झाल्या होत्या.

  - पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधव शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रंदिवस तत्पर असतात. आणि अशा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या परिवारात किंवा बहिणीकडे जाता येत नाही आणि रक्षाबंधनाच्या उत्सवात सहभागी होता येत नाही म्हणून आम्हा बहिणींच्या वतीने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. - स्वाती पाटील, प्रशिद्ध कवी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News