प्राध्यापक रामराव यांचा सत्यशोधक दशक्रिया विधी,कुटुंब आणि त्यांचे विध्यार्थी यांचेकडून बहुजन विध्यार्थ्यांना दरवर्षी समाज भूषण पुरस्कार


प्राध्यापक रामराव यांचा सत्यशोधक दशक्रिया विधी,कुटुंब आणि त्यांचे विध्यार्थी यांचेकडून बहुजन विध्यार्थ्यांना दरवर्षी समाज भूषण पुरस्कार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :


जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्राध्यापक दिनेश उर्फ रामराव रोडे यांचा दशक्रिया विधी सार्वजनिक सत्य धर्म सत्यशोधक नुसार झाला मा रोडे सर हे  दहा दिवसापूर्वी अनंतात विलीन झाले,त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण सेवा म्हणून ज्ञानार्जनाची कार्य केले तसेच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संत महापुरुषांचे वैज्ञानिक विचार कला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आणि महात्मा फुले स्थापित सार्वजनिक सत्य धर्म नुसार स्वतःच्या घरापासून सुरुवात करून गावातील बहुतांश लोकांपर्यंत  कार्य पोहोचवले, तसेच गावांमध्ये शाळेसाठी स्वतः विविध उपक्रम राबवून मुलांचे व लोकजागृतीचे कार्य केले रोडे सर हे सावित्रीबाई फुले यांच्या माहेरकडील नातलग आहेत,सावित्रीबाई रोडे यांच्या वंशावळ असून सावित्रीबाई रोडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नंतर सहा वर्ष सार्वजनिक सत्य धर्म या संस्थेची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती, आणि त्यांच्याच वारसाने हे रोडे कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबावर वैज्ञानिक  ज्ञानार्जनाचा आरंभ होऊन त्यांना दोन मुले व एक मुलगी हे उच्चशिक्षित असून एक मुलगा परदेशात नोकरीला आहे,मुलगी व मुलगा दोघेही इंजिनियर आहेत जावई हे इंजिनिअर असून पुण्यामध्ये नामांकित  कंपनीत उद्योजक आहेत, रोडे सर यांच्या स्मरणार्थ इच्छेनुसार निसर्गातील कुठलीही हानी न होता त्यांचा सर्व विधी वैज्ञानिक दृष्ट्या संपन्न झाला तो असा त्यांचा विधी झाल्यानंतर त्यांच्या हस्ती पाण्यात प्रदूषण होऊ नये म्हणून घरासमोर खड्डे खोदून त्यामध्ये स्मृतीवृक्षाचे वृक्षरोपण केले आणि समाजातील बांधवांना चांगला संदेश देण्यासाठी आलेल्या सर्व मित्र तसेच पाहुणेमंडळी यांना प्रत्येकी एक झाड आणि एक पुस्तक भेट देऊन सध्या जागतिक महामारी कोरोनाचा काळ असून सर्व शासकीय नियमाचे पालन करून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला यावेळी तालुक्यातून जिल्ह्यातून त्यांचे सहकारी रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी पदाधिकारी आणि तालुक्यातील  पाहुणे, मित्र मंडळ हजर होते पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले यावेळी एडवोकेट मा अरुण जाधव मा दशरथ हजारे गुरुजी मा मारुती रोडे गुरुजी प्राध्यापक मा शिंदे सर चापडगाव मा प्रशांत शिंदे सरपंच जवळा मा राजेंद्र राऊत सामाजिक कार्यकर्ते मा सोनमाळी सामाजिक कार्यकर्ते कर्जत मा राजेंद्र राऊत मा बाबुराव हजारे मा राजेंद्र फाळके अनेक मान्यवर हजर होते, त्यांचा मोठा परिवार असून त्यांचे भाऊ नातवंडे सर्व हजर होते तसेच गावातील बांधव, पाहुणे सामाजिक मंडळींनी सत्यशोधकीय कार्याच अनुकरण करण्याचे मान्य केले व या पुढील काळात सर्व विधी याच प्रमाणे होतील यावर एक मताने मान्य केले, त्याचबरोबर प्राध्यापक मा दिनेश रोडे सर यांच्या नावाने एक वाचनालय चालू करून प्राध्यापक रोडे यांच्या नावे दरवर्षी विद्यार्थ्यांना आणि बहुजनातील उच्च कामगिरीतील युवकांना विद्यार्थ्यांना समाज भूषण  पुरस्कार देण्याचे सर्वानुमते मान्य केले, त्यांची मुले व कुटुंब पुढीलप्रमाणे डॉक्टर मा अतुल रोडे, मा उद्धव रोडे, मा दादा रोडे, सौ सुप्रिया ढगे, सौ संगिता रोडे, मा योगिता रोडे, मा गणेश ढगे, सौ ज्योती बनकर, मा नितीन बनकर, मा बापुराव हजारे, मा प्रशांत शिंदे, मा अंबादास रोडे इतर अनेक नातेवाईक असा त्यांचा मोठा परिवार आहे,तसेच रोडे सरांचे विध्यार्थी प्राध्यापक लांगोरे 5001,ऍड अरुण जाधव 5001,सेवानिवृत्त कृषिअधिकारी नीलकंठ अभंग कोर्टी तालुका करमाळा 5001 यांनी रोडे सरांच्या नावाने समाज भूषण पुरस्कारा सोबत दरवर्षी देणगी देणार असल्याचे सांगितले आहे,हा सत्यशोधक विधी आज जवळा या त्यांच्या घरासमोर पार पडला यावेळी ह भ प मा सत्यशोधक वारकरी मा संपतराव लांडगे यांचे व्याख्यान झाले आणि मा बापुराव हजारे सत्यशोधक मा भीमराव कोथिंबिरे यांनी विधीकार्य संपन्न केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News