केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्यावर महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली काल व परवाची कारवाई ही सूडबुद्धीने राजकीय व्देशापोटी करण्यात आली म्हणून खेड- राजगुरुनगर तालुका येथे भाजपाच्या वतीने धडक निषेध मोर्चा घेण्यात आला.


केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्यावर महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली काल व परवाची कारवाई ही सूडबुद्धीने राजकीय व्देशापोटी करण्यात आली म्हणून खेड- राजगुरुनगर तालुका येथे भाजपाच्या वतीने धडक निषेध मोर्चा घेण्यात आला.

 तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, जिल्हाध्यक्ष भाजपा कायदा आघाडी - ॲड. संजय सावंत पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निषेध मोर्चा ला संबोधन केले.


अदखलपात्र स्वरुपाची तक्रार ही मोडतोड करत गंभीर दखलपात्र गुन्ह्यांत वळवून सर्व कार्यपध्दती व कायदे यांना मुरड घालून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करुन आघाडी सरकारने घटनाबाह्य वर्तन केले आहे. तसेच राज्यघटनेतील समता, बंधूता व न्याय या तत्वांची पायमल्ली करत दुजा भाव करत इतरांना एक व राणे साहेबांना एक असे दुटप्पी धोरण वापरुन दबंगशाही केली आहे. असे विचार सर्व भाजपा पदाधिकारी यांनी व्यक्त केले.


सत्तेचा बेकायदेशीर वापर करत करण्यात आलेल्या कारवाईचा भाजपा च्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला..


राणेंच्या वक्तव्याच्या निषेधाच्या नावाखाली शिवसेनेने सत्तेच्या बळावर अक्षरशः गुंडगिरी करुन काल धुडगूस घातला. सर्व मर्यादा विसरून भाजपाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे, भाजपाच्या कार्यालयांवर दगडफेक करून जाळपोळ केली...


राज्यात कायद्याचे राज्य संपुष्टात आले असून, महाराष्ट्र पोलीस राज्य सरकारच्या दबावाखाली काम करीत आहेत. म्हणूनच भारतीय जनता पार्टी खेड तालुका च्या वतीने राजगुरुनगर खेड तहसिलदार कार्यालय येथे मोर्चा घेण्यात आला तसेच भाजप ची संस्कृती जपत शांततेत कचेरी समोर तीव्र शाब्दीक घोषणा व निषेध करुन मा. तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. 


यावेळी भाजपा खेड तालुका अध्यक्ष मा.शांताराम भोसले, जि.प.सदस्य मा. अतुलभाऊ देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी  - ॲड. संजय सावंत पाटील, आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष - गुलाबराव खांडेभराड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष - राजनभाई परदेशी, कायदा आघाडी तालुका अध्यक्ष - ॲड. प्रदीप उमाप, खेड तालुका संघटन सरचिटणीस ॲड. प्रितम शिंदे , खेड शहर अध्यक्ष बाळासाहेब कहाणे, चाकण शहाराध्यक्ष अजय जगनाडे, खेड तालुका महिला मोर्चा  अध्यक्ष- ॲड. मालिनी शिंदे, खेड शहर महिला मोर्चा अध्यक्ष- दिप्ती कुलकर्णी, पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस - संदेश जाधव, चाकण शहर उपाध्यक्षा अरूणा पगारे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, तालुका उपाध्यक्ष चांगदेव ढमाले, तालुका उपाध्यक्ष शंकर खेंगले, तालुका उपाध्यक्ष अशोक नाईकरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे, नगरसेवक मनोहर सांडभोर, अनूसुचित जाती मोर्चा जिल्हा सचिव दीपक मराठे, नगरसेवक मंगेश गुंडाळ, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप दसगुडे, अनुसुचित जमाती मोर्चा चाकण शहर अध्यक्ष गणेश उंबरे, भाजपा पदाधिकारी  मयुर होले,  किशोर कुमठेकर, बाळासाहेब विरकर, वैभव पिंगळे, मोतीलाल बाविस्कर, सुदर्शन मुळुक, संदीप होले, धिरज आदक, अमीर पाटोळे, संतोष भोज, ईश्वर पगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....

जाहिरात
Search
विडिओ
Recent News