नगर तालुक्यातील वाळकी येथील दारूच्या अड्ड्यावर छापा 31 हजाराचा मुद्देमाल जप्त- नगर तालुका पोलिसांची कारवाई


नगर तालुक्यातील वाळकी येथील दारूच्या अड्ड्यावर छापा 31 हजाराचा मुद्देमाल जप्त- नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत :) विनापरवाना बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारु , कचे रसायन असा माल विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने त्या अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा घालून ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई नगर तालुक्यातील वाळकी येथे केली . याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या प्रमाणात दारू बनवून विक्री केली जाते , अशी माहिती नगर तालुका पोलिसांनी मिळाली . यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेवरून नगर तालुका पोलिसांनी वाळकीतील धोंडेवाडी येथील तलावाजवळ सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकला . पोलिसांना पाहताच दारू अड्डा मालक संतोष दिलीप पवार ( राहणार धोंडेवाडी , वाळकी , तालुका नगर ) हा पळून गेला . या कारवाईत चोवीस हजार रुपये किमतीची चारशे लिटर हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन , सात हजार रुपये किमतीची सत्तर लिटर हातभट्टी तयार दारू असा ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई पोलिस हवालदार गणेश लबडे , महिला पोलिस हवालदार अमिना शेख , पोलिस हवालदार काळे , पोलिस नाईक बी . बी . कदम व योगेश ठाणगे यांनी केली .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News