जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधत इनरव्हील क्लब ऑफ शेवगावच्या महिला सदस्यांनी येथील वृद्धाश्रमाला भेट देत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधल्या


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधत इनरव्हील क्लब ऑफ शेवगावच्या महिला सदस्यांनी येथील वृद्धाश्रमाला भेट देत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधल्या

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधत इनरव्हील क्लब ऑफ शेवगावच्या महिला सदस्यांनी येथील वृद्धाश्रमाला भेट देत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधल्या. तसेच त्यांची आरोग्य तपासणी केली. या उपक्रमाने वयोवृद्धांच्या चेह-यावर हास्य फुलले.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. मनिषा लड्डा,  सेक्रेटरी अनुजा लड्डा,  माजी अध्यक्षा रूपाली तडवळकर योगिनी पाटील व वसुधा सावकर आदींनी येथील वृद्धाश्रमाला भेट देत हा विधायक उपक्रम राबविला.  तेथील ज्येष्ठ नागरिकांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या. डॉ. मनिषा लड्डा  व त्यांच्या पथकाने ज्येष्ठ नागरिकांची रक्त तपासणी, साखर व इसीजी टेस्ट करून त्यांना आरोग्यविषयक सल्ला दिला. या वेळी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना लाडू, खजूर, शेंगदाणा चिक्की, केळी यांचे वाटप करण्यात आले. तसेच मास्क, सॅनिटायझर बाटल्या, प्रथमोचार साहित्य व मेडिकल देण्यात आले.

या वेळी डॉ. मनिषा लड्डा म्हणाल्या की, आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना भगवानाचा दर्जाच नव्हे तर त्यापेक्षा उच्च स्थान  दिलेले आहे. काळ वेगाने बदलत असताना भारतीय समाजात काही चांगल्या प्रथा आल्या तर काही विकृतीही आल्या आहेत. आज कालच्या समाजात वृद्धाश्रम करण्याची दुर्दैवाने वेळ आली. काहींना ते वरदान तर काहींना ते शाप आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News