धन्वंतरी रूग्णालयात कोव्हीशील्ड खाजगी लसीकरण केंद्राला सुरूवात


धन्वंतरी रूग्णालयात कोव्हीशील्ड खाजगी लसीकरण केंद्राला सुरूवात

- शेवगावः धन्वंतरी रूग्णालयात कोव्हीशील्ड खाजगी लसीकरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे. समवेत डॉ. संजय लड्डा, डॉ. मनिषा लड्डा , डॉ. विकास बेडके, बाळासाहेब चौधरी आदी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी खाजगी कोव्हीशील्ड लसीकरण केंद्र म्हणून येथील धन्वंतरी रूग्नालयाला शासनाने परवानगी दिली असून लसही उपलब्ध झालेली आहे. शासकिय केंद्रातील गर्दी टाळण्यासाठी ज्यांची ऐपत आहे त्यांनी खाजगी रूग्नालयात लसीकरण करावे, असे आवाहन ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी केले.

येथील धन्वंतरी रूग्नालयात कोरोना प्रतिबंधक खाजगी कोव्हीशिल्ड लसीकरण केंद्राचे उदघाटन डॉ. काटे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी धन्वंतरी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय लड्डा, डॉ. मनिषा लड्डा,  तालुका मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास बेडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, डॉ. दिनेश राठी, डॉ. आशिष लाहोटी, भागनाथ काटे, डॉ. कृष्णा देहाडराय, डॉ. दीपक परदेशी आदी उपस्थित होते.

डॉ. काटे म्हणाले, कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सर्वांसाठी उपयोगाचे आहे. शासकिय रूग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असले तर लस पुरवठा कमी होत असल्याने गर्दी वाढते. त्यामुळे खाजगी लसीकरण केंद्राची सुद्धा गरज आहे. ज्यांची अर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांनी धन्वतंरी रूग्णालयातील खाजगी  लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करावे. सरकारी दरानुसार ७८० रुपयांना सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण करून घेऊ शकतात.

डॉ. संजय लड्डा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर डॉ. मनिषा लड्डा यांनी आभार मानले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News