पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोनाचे नियमाचे पालन करून सर्वांसाठी खुले करावे... ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची वन अधिकाऱ्याना सूचना...


पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोनाचे नियमाचे पालन करून सर्वांसाठी खुले करावे... ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची वन अधिकाऱ्याना सूचना...

पुणे दि. २४ : पुण्यातील भांबुर्डा विभागाच्या प्रश्नांबाबत अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून वारंवार निवेदन उपसभापती कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यामध्ये तेथील प्रश्न सोडवण्यासाठी यासर्वांनी विनंती केली होते त्याअनुषंगाने उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज   भांबुर्डा आणि पुणे रेंज मधील विविध टेकड्या ह्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली. या टेकड्यांचे  संगोपन वन विभागाने कसे केलेले आहे? तसेच अनेक सामाजिक संस्थांना वृक्ष लागवड करायची इच्छा आहे त्याबाबत वनविभागाचे धोरण काय आहे ?  काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे का ? हे पाहणे आवश्यक असल्याने आज या ठिकाणी डॉ गोऱ्हे यांनी भांबुर्डा वनविभागाला भेट दिली. यावेळी पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोनाचे नियमाचे पालन करून सर्वांसाठी खुले करावे अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित वन अधिकाऱ्यास केल्या. यावेळी वनक्षेत्रपाल श्री प्रदीप संकपाळ, श्री शिरीष फडतरे - सदस्य फी वाढ नियामक मंडळ, डॉ शैलेश गुजर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

         वन विभाग हा शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असून अनेक सामाजिक उपक्रम या विभागामार्फत राबविला जातात या योजनांची माहिती डॉ गोऱ्हे यांनी घेतली. कोरोनाचे अनेक ठिकाणी निर्बंध कमी झाले अजूनही वनविभागाचे निर्बंध चालूच आहे. सामाजिक अंतराचे  नियम पाळून भांबुर्डा वन उद्यान  खुले करण्या बाबत आवश्यक कार्यवाही करावी व 

 या परिसरात पुण्यातील नागरिकांना सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी वेळ निश्चित करावे व हे भांबुर्डा वन उद्यान उद्यान खुले  करणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले. तसेच या भागात ड्रोन मार्फत सर्व्हे करून अतिक्रमण कोठे आहे का याबाबत माहिती घ्यावी. तसेच अनेक नागरिक या ठिकाणी  फिरण्यासाठी येतात येथे असणारे भटके कुत्रे मोठ्याप्रमाणात असल्याने कुत्र्यापासून धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे पुणे महानगरपालिका यांच्या मदतीने भटके कुत्रांचा बंदोबस्त करावा असे देखील सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली. त्यामध्ये पुणेकरांच्या पर्यावरणाच्या रक्षण व्हावं हे ही महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या ना.डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिलेल्या आहेत.  सगळ्या नियमाने तपासून घेऊन लवकरात- लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. सुरक्षितता आणि हनुमान टेकडी त्यांच्याकडेही डॉ शैलेश गुजर यांनी लक्ष वेधले आहे. या वन उद्यानात अनेक सामाजिक संस्थानी झाडे लावण्याची परवानगी मागितली आहे  त्यांना नियमात राहून झाडे लावण्यासाठी परवानगी देणेबाबत डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News