राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? -चंद्रकांत पाटील


राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? -चंद्रकांत पाटील

पुणे:केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक म्हणूनच ओळखले जातात. ती त्यांची शैली आहे. प्रत्येकाची एक शैली असतेच. मी शैलीचं समर्थन करत नाही, पण त्यासाठी थेट अटक कितपत योग्य ठरेल? राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? सरकार, प्रशासनाने याविषयी त्यांच्याशी चर्चा करावी. अशी मागणी भाजपचे आमदार  चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यात आज शेतकर्‍यांची उपस्थितीत रिंग रोड संबंधीच्या तक्रारीबाबत बैठक पार पडली.त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं माझं मत आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो. असे पाटील म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News