सामाजिक बांधिलकीतुन प्रश्न सोडवण्याची तळमळ फक्त विखे घराण्यात-राजेश डांगे


सामाजिक बांधिलकीतुन प्रश्न सोडवण्याची तळमळ फक्त विखे घराण्यात-राजेश डांगे

श्रीगोंदा(प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुका आणि विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण राज्य सरकार कडून त्याची सदर प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी समर्थक यशस्वी प्रयत्न करत नाहीत पण ती धमक लोकसेवा ध्येय असलेल्या विखे घराण्यात असून खा.सुजय विखे औद्योगिक वसाहत,पाटपाणी नियोजन,श्रीगोंदा शहराला वरदान ठरणारा महामार्ग आदी बाबत सतत प्रयत्नशील असल्याचे नगरसभा आंदोलन अध्यक्ष राजेश डांगे यांनी सांगितले

डांगे म्हणाले तालुक्यातील साकळाई लिफ्ट इरिगेशन ,पाटपाणी बाबत आ.राधाकृष्ण विखे यांनी देखील विधानसभेत प्रश्न मांडला होता.लोकांनी देखील आता विखे बरोबर उभे राहण्याची गरज आहे प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक सामाजिक बांधिलकीतुन फक्त विखे घराणेच करू शकते म्हणूनच उत्तरेतील विखे दक्षिण मधून मताधिक्याने विजयी झाले.

असे सांगून आरोग्य,रोजगार,रस्ते,केंद्रातील योजना तालुक्यात राबविण्यासाठी आपण खा.विखे यांना निवेदन दिले असून आम्ही देखील आजपर्यंत समाजकारण केले पदाची अपेक्षा धरली नाही यापुढेही तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी खा.विखे यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे राजेश डांगे यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News