शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानासाठी स्मार्टफोनचा वापर नवीन ॲप डाऊनलोड


शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानासाठी स्मार्टफोनचा वापर नवीन ॲप डाऊनलोड

केडगाव प्रतिनिधी :नवनाथ खोपडे

केडगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय , आंबी येथील कृषी दुत शुभम दत्तात्रय ढमे यांनी   ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) २०२१-२२ च्या अंतर्गत केडगाव (ता. दौड, जि. पुणे )गावातील शेतकऱ्यांसाठी करोनाच्या काळातील मार्गदर्शक तत्वाचे पालन करीत कृषी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.

      शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानासाठी स्मार्टफोनचा वापर, नवीन ॲप डाऊनलोड करणे, नोंदणी करणे तसेच उत्पादन, हवामानाचा अंदाज, पिक काढणी व इतर नियोजन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबर माती परीक्षण कशी करावी व त्याबाबत सर्व सुयोग्य माहिती दिली. हि सर्व माहिती चार्ट आणि व्हिडीओच्या साह्याने देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

 या वेळी प्राचार्य .बी.खोब्रागडे, प्रा. निंबाळकर   सर , प्रा.घाडगे सर. कौलागे सर यांच्या मार्गदर्शशन लाभले .यावेळी सरपंच अजित शेलार,उपसरपंच आशोक हंडाळ, ढोलार भाऊसाहेब,दिलीप हंडाळ,धनाजी हाके,सुहास जगताप,राजेद्र‌  टेऺगले,पाटोळे मॅडम,आरती दळवी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News