अहमदनगर शहरातून मोटार सायकली चोरणारी सराईत टोळी २ , ९ ५,००० / -रु . किं . च्या सहा मोटार सायकलीसह जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


अहमदनगर शहरातून मोटार सायकली चोरणारी सराईत टोळी २ , ९ ५,००० / -रु . किं . च्या सहा मोटार सायकलीसह जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर ( प्रतिनिधी  संजय सावंत )अहमदनगर शहरातून मोटार सायकली चोरणारी सराईत टोळी २ , ९ ५,००० / -रु . किं . च्या सहा मोटार सायकलीसह जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई . 

दिनांक १६/०८/२०२१ रोजी फिर्यादी श्री . गणेश सोहनलाल गुलाटी , वय- २२ वर्षे , रा . इंदीरा कॉलनी , तारकपूर , अहमदनगर हे त्यांचे मालकीची बजाज पल्सर मोटार सायकल नं . एमएच - १६ - सीपी -२६११ ही त्यांचे घरासमोर पाकींग करुन घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती . सदर मोटार सायकल चोरी बाबत तोफखाना पो.स्टे . गुरनं . १७००/२०२१ , भादवि कलम ३७ ९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता . वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच अहमदनगर शहरामध्ये दुचाकी वाहन चोरीच्या घटनामध्ये वाढ झालेली असल्याने मा . पोलीस अधीक्षक सो , अहमदनगर यांचे आदेशाने श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे तपासाबाबत सुचना दिल्या होत्या .त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून तपास करीत असताना पोनि / अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , वरील नमुद गुन्हा हा दिलीप शिंदे , रा . नागरदेवळे , ता . नगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , गणेश इंगळे , पोहेकॉ / संदीप पवार ,पोन / शंकर चौधरी , विशाल दळवी , संतोष लोढे , संदीप चव्हाण , लक्ष्मण खोकले , ज्ञानेश्वर शिंदे , पोकों / कमलेश पाथरुट , योगेश सातपुते व चापोहेकॉ / संभाजी कोतकर अशांनी मिळून नागरदेवळे येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे १ ) दिलीप दत्तात्रय शिंदे , वय -२६ वर्षे , रा . गोंधळे मळा , नागरदेवळे , ता . नगर यास ताब्यात घेतले . त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला . त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार प्रफूल्ल गांगेकर , रा . नागरदेवळा असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे २ ) प्रफूल्ल गजानन गांगेकर , वय -३० वर्षे , रा . गोपळे मळा , नागरदेवळा , ता . नगर यास ताब्यात घेतले . नमुद दोन्ही आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेली ९ ०,००० / -रु . किं.ची काळे रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली . आरोपींना विश्वासात घेवून अहमदनगर शहरामधून आणखी किती मोटार सायकली व कोठून चोरलेल्या आहेत याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी अहमदनगर शहरातून रेल्वे स्टेश पाकीग , गुलमोहोर रोड , नेता सुभाष चौक , गोविंदपुरा व सिव्हील हॉस्पिटल येथून मोटार सायकली चोरलेल्या असून त्यापैकी तीन मोटार सायकली ह्या भिंगार व नागदेवळा येथे विकल्या असून दोन मोटार सायकली आमच्याकडे असल्याचे सांगीतल्याने सदर माहितीचे आधारे आरोपी नामे ) खालील बालम शेख , वय -४५ वर्षे , रा . नागरदेवळा , ता . नगर , ४ ) अमजद हुसेन शेख , वय- ४५ वर्षे , रा . मोमीनपूरा , भिंगार यांना ताब्यात घेतले . तसेच आरोपी ५ ) अक्तार जहूर अहमद शेख , रा . गवळीवाडा , भिंगार याचा शोध घेतला . परंतू तो मिळून आला नाही . ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून खालील प्रमाणे मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत . अ.न. १ किमत मोटार सायकलचे वर्णन ९ ०,००० / -रु . काळे रंगाची , लाल पट्टा अस नाज पल्सर मो . सा . विना | नंबरची चे . नं . MD 1 / 3CA07050 , इं . नं . DHYCK87606 चोरी केलेले ठिकाण तारकपूर बस स्टैंड

3 ४ ८०,००० / -रु . चॉकलेटी रंगाची अॅक्सीस १२५ मॉडेलची मोपेड मोटार रेल्वे स्टेशन , पार्कींग , विना सायकल , नंबरची , तिचा नं . अ.नगर MB8DPI1ACJ8783125 व इंजिन नंबर AF211619106 ३५,००० / -रु . काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल , विना नंबरची , गुलमोहर रोड , अ.नगर | तिचा चेसी नंबर MBLHAIOASDHE55173 व इंजिन नंबर HAIOELDHEO1286 असा असलेली . ४०,००० / -रु . पढिये रंगाची , हिरो ड्यूएट , मोपेड मोटार सायकल , विना नेता सुभाष चौक , अ.नगर नंबरची , तिचा चेसी नंबर MBLHAIOASDHE55173 व इंजिन नंबर HAIOELDHEO1256 असा असलेली . २५,००० / -रु . एक काळया रंगाची , यामाहा कंपणीची आरएक्स १०० मोटार गोविंदपूरा , अ.नगर सायकल , विना नंबरची , तिचा चेसी नंबर 95GIL1535833 व इंजिन नंबर 1L1335833 असा असलेली . २५,००० / -रु . कि . चे एक काळा रंगाची हिरो होडा स्प्लंडर कंपनीची मोटार सिव्हील हॉस्पिटल , अ.नगर सायकल , विना नंबरची , तिचा चेसी नंबर 98KI9F0785 व इंजिन नंबर 9817E07281 असा असलेली . ५ ६ वरील प्रमाणे २ , ९ ५,००० / -रु . किं . च्या सह मोटार सायकली जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पो.स्टे . हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे . करीत आहेत . वरील आरोपीपैकी प्रफूल्ल गजानन गांगेकर व दिलीप दत्तात्रय शिंदे हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द मोटार सायकल चोरी बावत खालील 23  गुन्हे दाखल आहेत . 


आरोपी प्रफूल गजानन गांगेकर याचे विरुध्द 20 गुन्हे दाखल आहेत.

९ सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . विशाल ढुमे साहेब , उप विभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News