राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथे श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त यांची सदिच्छा भेट


राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथे श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्त यांची सदिच्छा भेट

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर

             कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस ८ कि.मी. अंतरावर उत्तर -दक्षिण वाहिनी ( उत्तर काशी ) म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या कुंभारी येथील अंदाजे १३ व्या शतकातील अखंड शिळेमध्ये व अप्रतिम कलाकुसर केलेले आकर्षक प्राचीन राघवेश्वर देवस्थानास शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कान्हुराजजी बगाटे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली . 

           सदिच्छा भेटी दरम्यान राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री १०८ राघवेश्वरानंद गिरी महाराज व शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाच्या नियमाचे पालन करत राघवेश्वराचे दर्शन घेऊन मंदिर व मंदिर परिसराची पहाणी केली त्यावेळी त्यांच्या समवेत सुधाकर धनवटे, कैलास कबाडी, कारभारी यमाजी कदम, राजेंद्र वारुळे, सतिष निळकंठ, दत्तु ठाणगे, बाळासाहेब माधव पवार, लक्ष्मण देवकर, किसन कोकाटे, बारकु शेजवळ अन्य भावीक भक्त उपस्थित होते .

        राघवेश्वर देवस्थान हे प्राचीन काळापासून उत्तर - दक्षिण काशी गंगा म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या गोदावरीच्या तीरावर पंचवीस फुट उंच आहे. तेथील मठाचे मठाधिपती श्री श्री १०८ राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या कॄपा आशिर्वादाने निसर्गरम्य पर्यटन स्थळ , गो. शाळा, भव्यदिव्य सभामंडप, अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार व नवीन मंदिरे उभारण्यात आलेली आहे. त्याचप्रमाने गोदावरी नदी ते राघवेश्वर मंदिरापर्यंत गोदाघाटाचे बांधकाम अनेक दानशुरांच्या माध्यमातुन चालू आहे.अशा या पवित्र ठिकाणी अनेकांनी भेटी देऊन आपले जीवन धन्य झाल्याचे मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News