बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही, विशेषतः तरुणांनी नियमांचे पालन करावे--पो. नि. विनोद घुगे


बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही, विशेषतः तरुणांनी नियमांचे पालन करावे--पो. नि. विनोद घुगे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :


दौंड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची यवत येथे बदली झाल्यानंतर दौंड पोलीस स्टेशनचा चार्ज पोलीस निरीक्षक विनोदकुमार घुगे यांनी घेतला आहे, त्यांनतर त्यांनी दौंड शहरात पोलिसांसह पहाणी केली,पुढे शालिमार चौक,गोपाळ वाडी रोड, सरपंच वस्ती परिसराची पहाणी करून माहिती घेतली,त्यावेळी रस्त्यावर बेशिस्तपणा दिसून आला,त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की शहरात तसेच परिसरात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, कोरोना महामारी अजून कमी झालेली नाही, त्यामुळे सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करायचे आहे,उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, शहरातील सर्व रस्ते रिकामे ठेवा,पथारी वाले, हातगाडी वाले यांनी रस्त्यावर अतिक्रमण करू नये,वाहने शिस्तीत लावा,अस्ताव्यस्त लावल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी, विशेषतः तरुणांनी नियमांचे पालन करायचे आहे, ट्रिपल सीट,बिना लायसन्स फिरणारे यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे,दौंड  शहरात 18 पगड जातीचे लोक राहतात, त्यामुळे जातीपातीचे राजकारण करू नये,तात्विक राजकारण असावे,नेत्यांनी सर्वसमावेशक पद्धतीने समाजाला घेऊन चालावे,शहरात, तालुक्यात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी,जनतेने आम्हाला सहकार्य करावे, आम्ही जनतेच्या सोबत आहोत असेही यावेळी पोलीस निरीक्षक विनोद कुमार घुगे यांनी सांगितले आहे, त्यांनी यापूर्वी पंढरपूर,मंदृप पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण,यवत,वेल्हा, अक्ट्रसीटी डिपार्टमेंट, सोलापूर शहर याठिकाणी आपले कर्तव्य बजावले असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News