पहिल्या टप्प्यात वारजे येथील ५०,तर महंमदवाडी येथील ४५ एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार


पहिल्या टप्प्यात वारजे येथील ५०,तर महंमदवाडी येथील ४५ एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार

पुणे:२०२०-२१ च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ४७ लाख १३ हजारांवर पोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.३९ वृक्ष एवढे आहे. २०१६-१७ च्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ३८ लाख ६० हजार इतकी होती, तरलोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांचे हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.२३ वृक्ष इतके होते. २०१६ नंतर शहरात मेट्रो, रस्तेसुधार, दुमजली उड्डाणपूल इत्यादी मोठ्या प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्रहे प्रकल्प राबवीत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी महापालिका आग्रही होती. यासह महापालिकेने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षांच्या संख्येत २२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. "जीपीएस" प्रणालीच्या साहाय्याने पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार शहरात वृक्षांच्या एकूण ४२९ प्रजाती आढळून आल्या आहेत. महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील वृक्षांची गणना यात झालेली नाही. कात्रज येथील "राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्रा" मुळे शहरात सर्वाधिक ११ लाख १३ हजार वृक्ष धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. तर दाट लोकवस्तीमुळे सर्वात कमी वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसर

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. या भागात केवळ १२ हजार वृक्ष आहेत. पर्वती, भांबुर्डा, वारजे आणि धानोरी येथील एकूण १,८२६ एकर वनक्षेत्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या साहाय्याने पुणे महापालिकेतील "संयुक्त वन व्यवस्थापन समिती"द्वारे येथील टेकड्यांवरील वृक्षांचे संवर्धन केले जाते. याशिवायपुणे जिल्ह्यातील पडीक जमिनींची माहितीही एकत्रित करण्यात आली आहे. त्यांपैकी किती जमिनींवर छोटी वनक्षेत्रे तयार करता येतील, याची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली गेली आहे. पहिल्या टप्प्यात वारजे येथील ५०,तर महंमदवाडी येथील ४५ एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे.

 पायाभूत सुविधांचा विकास करताना त्यात पहिला बळी पर्यावरणाचा जातो, हा आजवरचा अनुभव आहे. मात्रपुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असताना हरितक्षेत्र मात्र कमी न होता वृद्धिंगत झाले आहे. शाश्वत विकासाच्यादृष्टीने नियोजन आणि कृती हे यामागचे मुख्य कारण आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

जाहिरात
Search
विडिओ
Recent News