पोलिसांच्या विविध प्रश्नांवर आशिष साबळे पाटील यांची गृहमंत्र्यांना भेट.


पोलिसांच्या विविध प्रश्नांवर आशिष साबळे पाटील यांची गृहमंत्र्यांना भेट.

डावीकडून दिलीप वळसे पाटील,आशिष साबळे पाटील,धनंजय वाठारकर

पोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र या पोलिस अधिकारी ,कर्मचारी यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आशिष साबळे पाटील यांनी गृहमंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आज शिवगिरी या गृहमंत्री यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. पोलिसांचे मेडिक्लेम,वैद्यकीय सुविधा,पोलिस पाल्यांना पोलिस भरती मध्ये ठराविक जागा उपलब्ध करणे,पोलिस वसाहतींची दुरावस्था,रिटायर्डपोलिसांचे पेन्शन संदर्भात मारावे लागणारे हेलपाटे,पोलिसांचे कामाचे १२ तास असून ते कमी करून ८ तास करावे अशा अनेक मागण्या घेवून त्यांनी निवेदन दिले आहे.त्यावेळी सोबत धनंजय वाठारकर व प्रमुख पदाधिकारी ही उपस्थित होते.जाहिरात
Search
विडिओ
Recent News