मातंग समाजाच्या व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गाव गुंडा कडुन विरोध!!! तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन निषेध


मातंग समाजाच्या व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गाव गुंडा कडुन विरोध!!! तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन निषेध

अंकुश तुपे श्रीगोंद प्रतिनिधी:  माातंग समाजातील मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास जिल्हा सोलापूर माळशिरस तालुका मौजे माळवाडी (बोरगाव) येथे गावगुंडांनी विरोध केल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका कार्याध्यक्ष श्रीगोंदा तसेच  अनिल रोकडे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना श्रीगोंदयाच्या वतीने तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला... महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर या थोर विचारवंतांच्या विचारसरणीचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशभर ओळखला जातो.परंतु शुक्रवार दिनांक २०-०८-२०२१ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळवाडी (बोरगाव) येथे मातंग समाजातील बांधवाचे निधन झाले असता त्याच्या अंत्यविधीस काही गावगुंडांनी विरोध केला.व सदरचा अंत्यविधी होऊ दिला नाही.व गावातील मातंग समाजाचे तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्रित आल्यावर तो अंत्यविधी ग्रामपंचायत समोर करनुत्त आला..तरी ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. तरी त्या प्रकरणात सामील असणाऱ्या तेथील गावगुंडावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सदर लोकांना शीघ्रगतीने न्यायालयात शिक्षा झाली पाहिजे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राहुल बागे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष दिपक ससाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिपक साळवे,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे,लहुजी शक्ती तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, लहुजी शक्ती सेना तालुका युवक अध्यक्ष रघु शिंदे,लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष प्रफुल्ल आडगळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News