जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून 325 महिलांचे लसीकरण


जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून 325 महिलांचे लसीकरण

शिर्डी,राजेंद्र दूनबळे: कोरोनाचा उद्रेक होऊ नये या करिता लसीकरण गरजेचे असून कोणीही या पासून वंचित राहू नये या साठी जनसेवा फाऊंडेशन च्या माद्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सो,शालिनीताई विखे पा,यांच्या पुढाकाराने तसेच राहाता तालुक्याचे वेद्यकीय अधिकारी प्रमोद म्हस्के,पंचायत समितीचे वाकचोरे, आरोग्य अधिकारी डॉ श्रीधर गागरे,कृषी बाजार समितीचे बाळासाहेब जपे,पंचायत समितीचे ओमेश जपे यांच्यामार्गदर्शना खाली सावलीविहिर येथे लसीकरणाच्या कार्यक्रम पार पडला.

सावळीविहीर गावातील स्वयंसाहाय्यता समूह मधील  325 महिलानि आरोग्य केंद्र येथे जाऊन  करोणाची प्रथम लसीकरण देण्यात आले ,त्याच प्रमाणे महिला बचत गट व सावळीविहीर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने  उपस्तीत राहून आरोग्य केंद्रात त्याचे लसीकरण करण्यात आले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिलानि  भाग घेतला  CRP: रिजवाना जावेद सय्यद  मॅडम", प्रकल्प अधिकारी: सौ."लोंढे मॅडम  यांचे सहकार्य सदर कार्यक्रमास लाभले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News