राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश क्लासचे घवघवीत यश 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र


राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश क्लासचे घवघवीत यश 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

नवनागापूर येथील यश क्लासचे राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.(छाया-अमोल भांबरकर)                     

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -नवनागापूर येथील यश क्लासचे राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.कु.प्रांजल ठोंबरे (150),अर्पिता निकम (147),साक्षी दारकूंडे (132),साई भुसाळ (138),आदित्य निकम (136),आदित्य नवाडे (133),प्रतिक कदम (132) अल्पिता बरे  (128), मानसी सोनार (128),अर्नव वराळे (124),सूजय केसकर (109),यशश्री गुंड (106),साक्षी कुदळे (100),श्रृंगार पर्वत (99) गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.एनएमएमएस शिष्यवृत्ती द्वारे पात्र विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.ज्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो.आणि प्रोत्साहन मिळते.यश क्लासच्या विद्यार्थ्यांना एकूण सहा लाख 72 हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यश क्लास तर्फे करण्यात आला.             आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि त्यातच कोरोना काळामुळे घरात राहून ऑनलाइन अभ्यास अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये जिद्द,सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.तब्बल 14 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.तर त्यांच्यातील गुणवत्ता अशाप्रकारे यशाच्या रुपात बहरुन येऊ शकते.असा आत्मविश्वास यश क्लासचे संचालक सचिन पुंड यांनी व्यक्त केला.                                                                                                             -

जाहिरात
Search
विडिओ
Recent News