माहिती तंत्र, माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


माहिती तंत्र, माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नवनाथ खोपडे, केडगाव प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील कृषीदूत गणेश रोहिदास सोनवणे यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत पडवी (ता.दौंड, जि.पुणे) गावातील शेतकऱ्यांसाठी करोनाच्या काळातील मार्गदर्शक तत्वाचे पालन करीत कृषी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.

      शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानासाठी स्मार्टफोनचा वापर, नवीन ॲप डाऊनलोड करणे, नोंदणी करणे तसेच उत्पादन, हवामानाचा अंदाज, पिक काढणी व इतर नियोजन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबर माती परीक्षण कशी करावी व त्याबाबत सर्व सुयोग्य माहिती दिली. हि सर्व माहिती चार्ट आणि व्हिडीओच्या साह्याने देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. 

      यावेळी प्राचार्य के. एच. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी, प्रा. ए. ए. शिंदे, कार्यक्रम समनव्यक, प्रा. एस. एस. बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकरी नामदेव सोनवणे, विकास काळे, वसंत निंबाळकर, गौरव रणधीर, निखील काळे, कांचन सोनवणे, पंकज शेलार आदी शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News