सायंबाच्यावाडीत हिरूबाईदेवी मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न


सायंबाच्यावाडीत हिरूबाईदेवी मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी याठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने साकारलेल्या ग्रामदैवत हिरूबाई देवी मंदिर मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना समारंभ दि. २२ ऑगस्ट रोजी (रविवारी) दुपारी ३ वा. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर व सायंबाच्यावाडीचे सरपंच हनुमंत भगत यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी मंदिर आवारात होळकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

   भव्य असे हिरूबाईदेवी मंदिर हे लोकवर्गणीतून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभे करण्यात आले आहे. मंदिरास रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केल्याने मंदिर खूपच आकर्षक दिसत आहे.

  या कार्यक्रमाप्रसंगी बारामती पंचायत समितीच्या सभापती नीताताई फरांदे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, माजी सभापती अमृता गारडे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दुर्योधन भापकर, सोमनाथ गायकवाड, निलेश केदारी, रविंद्र भापकर, सोमाजी ठोंबरे, अनिल हिरवे, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठान-मंडळ यांचे कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News