तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक प्रियंका चोथे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा.रुपाली काळे, चित्रकार अशोक डोळसे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर, शोभना धारक आदि. (छाया : राजु खरपुडे)

विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात आत्मविश्वासने स्वत:ला झोकून दिल्यास यश निश्चित मिळते-आरटीओ प्रियांका चोथे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - आज तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे, आजच्या विद्यार्थ्यांनीही त्यादृष्टीने आपली तयारी केली पाहिजे. त्यामुळे आपणास कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते क्षेत्र विचारपुर्वक निवडले पाहिजे.  आपल्या क्षमतांचा विचार करुन आवडत्या क्षेत्राची निवड करुन त्या क्षेत्रात आत्मविश्वासने स्वत:ला झोकून देऊन काम करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यासाठी आई-वडिल आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे असेल.   प्रत्येकात काही तरी सुप्त गुण असतात, त्या गुणांना प्रोत्साहन द्या. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने नेहमीच गुणवंत मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांचा सन्मान करुन त्यांना उर्जा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन मोटार वाहन निरिक्षक प्रियंका चोथे यांनी केले.    तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक प्रियंका चोथे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा.रुपाली काळे, चित्रकार अशोक डोळसे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्षा निता लोखंडे, सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, प्रसाद शिंदे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, शशिकांत देवकर, शोभना धारक आदि उपस्थित होते.याप्रसंगी प्रा.रुपाली काळे  म्हणाल्या, शिक्षण हे आपल्या जीवनाला आकार देत असते. त्यामुळे शिक्षण घेतांना आपली आवड-निवड व सध्याच्या परिस्थितीचा विचार करुन आपण क्षेत्र निवडले पाहिजे. आज मुलांबरोबर मुलींनाही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे मुलींनीही या संधीचा फायदा घेतला पाहिजे. ट्रस्ट करत असले मुलांच्या गौरवामुळे इतरही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.


    याप्रसंगी अध्यक्ष सागर काळे म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने समाज बांधवांच्या सर्वांगिण हिताबरोबरच विद्यार्थी, महिला यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे, त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. कोरोना काळात ट्रस्टच्यावतीने समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला आहे. यापुढील काळातही अशा उपक्रमातून समाजोन्नत्तीचे काम केले जाईल, असे सांगितले.    प्रारंभी श्री संताजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार अशोक डोळसे, हभप रामदास क्षीरसागर महाराज, कावेरी लुटे, ओंकार लोखंडे, प्रतिक देवराव आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रकाश सैंदर यांनी मानले.कार्यक्रमास किरण धारक, गणेश धारक, गौरी गायकवाड, वेदांत क्षीरसागर, ऋषीकेश लोखंडे, गौरी राहुल शिंदे, श्वेता करपे, गौरी प्रसाद शिंदे, प्रसाद भगत, कल्याणी लुटे, अर्जुन साळूंके, कावेरी लुटे, महिमा सैंदर, साक्षी चोथे, अभिजित थोरात, ऋतुजा चोथे, सिद्धी लोखंडे, प्रणव चोथे, अनुजा वालझडे, प्रणव बेलेकर, कावेरी शेंदूरकर  आदि उपस्थित होते.


 जाहिरात
Search
विडिओ
Recent News