आंबेडकरी चळवळीतील मंडळींच्या पुढाकारातून पुण्यात प्रथमच, सहकार तत्वावर उभे राहणार अल्प दरात सेवा देणारे अद्ययावत हॅास्पिटल


आंबेडकरी चळवळीतील मंडळींच्या पुढाकारातून पुण्यात प्रथमच, सहकार तत्वावर उभे राहणार अल्प दरात सेवा देणारे अद्ययावत हॅास्पिटल

पुणे:आज नियोजित बोधीसत्व सहकारी हॅास्पिटल उभारणी संदर्भात पुणे इंटरनॅशल स्कुल, विद्यानगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या बोधिसत्व सहकारी हॅास्पिटलचे प्रवर्तक नायडू हॅास्पिटलचे प्रशासकीय अधिकारी राजाभाऊ काळभांडे, प्राध्यापक गौतम मगरे व  डॉ. पी.टी.गायकवाड हे उपस्थित होते. 

पुण्यात प्रथमच, सहकार तत्वावर अद्ययावत अशा हॅास्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. हे हॅास्पिटल उभारणीसाठी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, विद्मवान व तज्ञ मंडळी पुढाकार घेणार आहेत. या सुसज्ज हॅास्पिटलचा फायदा सर्वसामान्य, गोरगरिब व गरजू रुग्णांना अल्पदरात वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्याकरीता होणार आहे. सर्वसामान्यांना अद्ययावत वैद्यकिय सेवा देण्याचा संकल्प या सर्वांनी मिळून केला आहे. 

विश्रांतवाडी, धानोरी, कळस, येरवडा व लोहगाव या परिसरातून हॅास्पिटरकरीता भाग भांडवल उभारणीसाठी आजच्या बैठकीचे खास आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे मुख्य संयोजन माधव गायकवाड आणि धनविजय यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. आजच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन हुलगेश भैय्या चलवादी हे होते. 

"सहकार क्षेत्रात इतर मंडळीनी मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांची उभारणी करुन प्रगती केली आहे. मात्र, आजवर सहकार क्षेत्रात बौद्ध समाज पाठिमागे राहिला आहे. तेंव्हा, बोधिसत्व सहकारी हॅास्पिटलच्या उभारणीसाठी सर्वांनी एकदिलाने एकत्रित येऊन व पुढाकार घेऊन स्वतःचे भाग भांडवल जमा करावे," असे आवाहन बैठकीचे अध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी केले. 

विशेष म्हणजे, या बैठकीत, हुलगेश चलवादी यांनी स्वतःचे नातेवाईक व कुंटूंबियातील २१ जणांचे या हॅास्पिटलमध्ये शेअर्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली. "आजच्या वाढत्या रोगराई च्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वसामान्य नागरिकांना अल्प दरात वैद्यकिय सेवा-सुविधा देणारे हॅास्पिटल उभारणे ही काळाची गरज आहे. तेंव्हा, काळाची गरज ओळखून व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थांनी ठेऊन नव्या प्रकारची रुग्णसेवा चळवळ उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित उभे रहावे" असे हुलगेश चलवादी यांनी शेवटी आवाहन केले.

या प्रसंगी या बैठकीस वनविभागाचे माजी अधिकारी अवचरे सर, आनंद कांबळे, दळवी ताई, शांतीपाल ओव्हाळ, सुबोध कांबळे, सावतकर, घाणार सर, येरवडा परिसरातील सर्व आंबेडकर चळवळीतील विचारवंत, विहाराचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News