दौंड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल संघाच्या अध्यक्षपदी दिपक पवार


दौंड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल संघाच्या अध्यक्षपदी दिपक पवार

;वार्ताहर ता.२१ ऑगस्ट

मराठी पत्रकार परिषद संलग्न सोशल मीडिया परिषदेचे संस्थापक एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने दौंड तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलची आज (ता.21 ऑगस्ट) रोजी यवत ता.दौंड येथील शासकीय विश्रामगृह या  कार्यालयात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


दौंड तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया सेल मध्ये दौंड तालुक्यातील वेब पोर्टल,ऑनलाइन न्यूज मीडिया,केबल टीव्ही,न्यूज चैनल टिव्ही,चैनल वृत्तवाहिन्या आदी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद मुंबई प्रतिनिधी  एम.जी.शेलार व दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र खोरकर यांनी यावेळी या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.यवत ग्रामपंचायतचे उपसरपंच बापू यादव यांच्या वतीने नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. 


तसेच यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध दिपक पवार यांची निवड करण्यात आलेली आहे.तसेच उपाध्यक्षपदी विनायक दोरगे,सचिव राहुल अवचट,खजिनदार अहिरेश्वर जगताप,समन्वयक मनोज कांबळे,कार्यकारणी सदस्य बाळासाहेब मुळीक,संदीप चव्हाण,अनिल गायकवाड, विकास शेंडगे,पवन साळवे,संजय सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित हरीभाऊ बळी,सुशांत जगताप,सचिन रुपनवर, जिवन शेंडकर आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News