लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने होणार करोना योद्धयांचा सन्मान - अँड.नितीन पोळ


लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने होणार करोना योद्धयांचा सन्मान - अँड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर,सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती चे औचित्य साधून करोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा करोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली 

      आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात नुकतीच सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी  १०१ जयंती साजरी करण्यात आली करोना परिस्थिती मुळे याही वर्षी जयंती साधे पणाने साजरी झाली मात्र *मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही*

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध लढण्याचे शिकवले तर *शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी* अनेक महापुरुषांनी आपले योगदान दिले 

मागील दिड वर्षांपासून करोना काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या *पत्रकार,डॉक्टर,पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते स्मशानभूमीत काम करणारे कामगार*  यांनी या कालावधीत मोलाचे कार्य केले लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक मा प्रा रामचंद्र भरांडे यांनी अनेकदा जयंती उत्सव नाचून नाही तर  महापुरुषांचे विचार वाचून साजरी करावी असे समाज बांधवांना आवाहन करत असतात त्यामुळे सत्यशोधक *अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या* जयंती निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने *करोना योद्धा* म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा लोक स्वराज्य आंदोलनाचा हा छोटासा प्रयत्न असला तरी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुन्हा एकदा काम करण्याची व समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम आहे असेही या पत्रकात म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News