स्व.जमनादास गुप्ता यांच्या 11 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त तर्फे एमजे असोसिएटतर्फे 24 ऑगस्ट 2021रोजी भजन संध्याचे फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन


स्व.जमनादास गुप्ता यांच्या 11 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त  तर्फे एमजे असोसिएटतर्फे 24 ऑगस्ट 2021रोजी  भजन संध्याचे फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन

पुणे -स्व. जमनादास गीताराम गुप्ता (गर्ग) यांच्या 11 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त हा  कार्यक्रम मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट 2021रोजी सायंकाळी 5 ते 6  या वेळेत भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन   करण्यात आले आहे.हा कार्यक्रम पुण्यातील औंध रोड येथील जमना अपार्टमेंट ,पहिला मजला येथे होणार असून कार्यक्रमासाठी स्वामी हिमांशू ,गायक गोकुळ महाजन व सहकलाकार भजन सादर करणार आहेत.जमनादास गुप्ता एक अध्यात्मिक व  सेवाभावी  व्यक्तिमत्व होते व त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली होती. त्यांच्या स्मृतीनिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.  हा कार्यक्रम श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनच्या फेसबुक पेज द्वारे लाईव्ह करण्यात येणार असून तो सर्वांसाठी मोफत असणार आहे. फिल्म प्रोडक्शन च्या फेसबुक पेज वर सर्वांसाठी मोफत दाखविला जाणार आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसेच सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती त्यांचे सुपुत्र व एमजे  असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News